सेक्युरीटी भेदत चिमुकल्याचा राहुल गांधींना गोड गोड पापा; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 10:37 IST2022-10-12T10:34:37+5:302022-10-12T10:37:51+5:30

काँग्रेसची भारत जोडो यात्रा गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. ही यात्रा सध्या कर्नाटकमधील पडाव याठिकाणी आहे. या यात्रेला तरुणांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांचा प्रतिसाद मिळत आहे.

video viral Rahul Gandhi being kissed by a child during Bharat Jodo Yatra | सेक्युरीटी भेदत चिमुकल्याचा राहुल गांधींना गोड गोड पापा; व्हिडिओ व्हायरल

सेक्युरीटी भेदत चिमुकल्याचा राहुल गांधींना गोड गोड पापा; व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसची भारत जोडो यात्रा गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. ही यात्रा सध्या कर्नाटकमधील पडाव याठिकाणी आहे. या यात्रेला तरुणांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांचा प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेतील एका लहान मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक लहान मुलगा गर्दीतून येऊन राहुल गांधी यांचा  गोड गोड पापा घेत असल्याचे दिसत आहे. 

या व्हिडिओमध्ये सचिन पायलट, राहुल गांधी आणि काँग्रेसचे इतर नेते दिसत आहेत. राहुल गांधी यांच्या मध्यभागी आहेत, पण गर्दीतून मार्ग काढत सुरक्षा वर्तुळ तोडत एक लहान मुलगा पुढे येतो आणि राहुल गांधींना किस करत असल्याचे दिसत आहे.

या लहान मुलाच्या कृत्याचा राहुल गांधी यांना राग आला नसल्याचे दिसत आहे. राहुल गांधी यांनी त्या मुलाला प्रेमाने पकडले आहे. यानंतर राहुल त्ंयाच्या खांद्यावर हात ठेवून पुढे जातात. आजूबाजूचे लोक या कृत्याकडे पाहत आहेत. पुढ राहुल गांधी त्या मुलाशी बोलतात. त्याची विचारपूस करतात. यामुळे राहुल गांधी यांचे सध्या कौतुक होत आहे. 

Web Title: video viral Rahul Gandhi being kissed by a child during Bharat Jodo Yatra