Video: भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 09:08 IST2023-10-01T09:07:33+5:302023-10-01T09:08:28+5:30

अपघातातील जखमींना उपचारासाठी कुन्नूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

Video: Terrible accident! A bus full of passengers fell into a valley, 8 people died | Video: भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू

Video: भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू

निलगिरी - तामिळनाडूच्या मरापलमजवळ भीषण अपघाताची घटना घडली. प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळल्याने ८ जणांचा मृत्यू झाला असून २७ पर्यंटक जखमी झाले आहेत. या बसमधून ६० प्रवाशी प्रवास करत होते. कोएम्बतूर जिल्ह्यातील उटी येथून ही बस मेट्टुयपालयमकडे जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलंय. 

अपघातातील जखमींना उपचारासाठी कुन्नूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली असून रुग्णवाहिका बोलवत वैद्यकीय यंत्रणांशी संपर्क साधला. दरम्यान, बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 

निलिगीरीच्या जिल्हाधिकारी करुणा यांनीही अपघाताची माहिती देताना सांगितले की, बसमध्ये ६० प्रवाशी प्रवास करत होते, अपघातानंतर बचाव पथकाने पूर्ण ताकदनिशी काम केलं असून जखमींसह सर्वच प्रवाशांना बसमधून बाहेर काढले. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून अन्य जखमींवर उपचार सुरू आहे, असेही करुणा यांनी सांगितले. 

 

Web Title: Video: Terrible accident! A bus full of passengers fell into a valley, 8 people died