सॅल्यूट! महिला पोलीस निरीक्षकानं बेशुद्ध व्यक्तीला खांद्यावर उचलून रुग्णालयात पोहोचवलं; VIDEO व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 21:24 IST2021-11-11T21:24:32+5:302021-11-11T21:24:59+5:30
यासंदर्भात, चेन्नईचे पोलीस आयुक्त शंकर जिवल म्हणाले, पोलीस निरीक्षक राजेश्वरी नेहमीच असेच काम करतात. आज राजेश्वरी यांनी रस्त्यावर पडलेला एक बेशुद्ध व्यक्तीची खांद्यावर उचलून मदत केली आणि त्याला रुग्णालयात पोहोचवले.

सॅल्यूट! महिला पोलीस निरीक्षकानं बेशुद्ध व्यक्तीला खांद्यावर उचलून रुग्णालयात पोहोचवलं; VIDEO व्हायरल
चेन्नई - तामिळनाडूची (Tamil Nadu) राजधानी चेन्नई येथील एका महिला पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या महिला पोलिसाने मुसळधार पावसात येथील टीपी छत्रम भागातील स्मशानभूमीत बेशुद्धावस्थेत पडलेल्या एका व्यक्तीचा जीव वाचविला. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. राजेश्वरी (Rajeshwari) असे या महिला पोलिसाचे नाव आहे. त्या पोलीस निरीक्षक (Police Inspector) पदावर कार्यरत आहेत. हा व्हिडिओ ट्विट करताना एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे, की चेन्नई येथे महिला पोलीस निरीक्षक राजेश्वरी यांनी रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडलेल्या एक व्यक्तीला आपल्या खांद्यावर उचलून रेस्क्यू केले आणि रुग्णालयात पोहोचवले. (Tamil Nadu woman police inspector)
यासंदर्भात, चेन्नईचे पोलीस आयुक्त शंकर जिवल म्हणाले, पोलीस निरीक्षक राजेश्वरी नेहमीच असेच काम करतात. आज राजेश्वरी यांनी रस्त्यावर पडलेला एक बेशुद्ध व्यक्तीची खांद्यावर उचलून मदत केली आणि त्याला रुग्णालयात पोहोचवले.
राजेश्वरी एका बेशुद्ध व्यक्तीला खांद्यावर घेऊन जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्या या व्यक्तीला आधी गाडीत बसवण्याचा प्रयत्न करतात, पण काही कारणास्तव ते शक्य होत नाही. यानंतर त्या या बेशुद्ध व्यक्तीला ऑटोमध्ये झोपवतात आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत उपचारासाठी रुग्णालयात पाठवतात.
#WATCH तमिलनाडु: चेन्नई में महिला पुलिस इंस्पेक्टर राजेश्वरी ने रास्ते पर पड़े एक बेहोश आदमी को कंधों पर उठाकर रेस्क्यू किया और अस्पताल पहुंचाया। pic.twitter.com/jDS9M6Djvw
— ANI_HindiNews (@AHindinews) November 11, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, बेशुद्ध व्यक्ती 28 वर्षांची होती. ती गुरुवारी स्मशानभूमीजवळ बेशुद्धावस्थेत पडली होती. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. सध्या चेन्नईतील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात शनिवारपासून पावसामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे.