Video : अन् सोनू सूदने पकडून दाखवलं, गावात उच्छाद मांडणारं वानर 'जाळ्यात' 

By महेश गलांडे | Published: February 11, 2021 12:28 PM2021-02-11T12:28:30+5:302021-02-11T12:34:22+5:30

सोनू सूद गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या माध्यमातून तो लोकांना मदत करतोय. कधी कोणाचा उपचार करतोय तर कधी मुलांच्या शाळेची फी भरतोय. सोनू सूद आपल्या हाकेला ‘ओ’ देईल, याची लोकांना इतकी खात्री झालीय

Video: An Sonu Sood catches a monkey in the net after requesting by villagers | Video : अन् सोनू सूदने पकडून दाखवलं, गावात उच्छाद मांडणारं वानर 'जाळ्यात' 

Video : अन् सोनू सूदने पकडून दाखवलं, गावात उच्छाद मांडणारं वानर 'जाळ्यात' 

Next
ठळक मुद्देसोनूने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. घ्या, आता वानरालाही पकडून दिलं. आता बोला... असे मजेशी ट्विट सोनू सूदने केलंय. सोनूने या ट्विटसोबत एक व्हिडिओही शेअर केला आहे.

मुंबई - माणसाचं कर्तृत्व माणसाला महान बनवत असते, आपली एक कृतीही आपली संवेदना सांगून जाते. कोरोना काळात अशा अनेक संवेदनशील घटना आपण पाहिल्या आहेत. कोरोना काळातील अनेक कोविड योद्धेही आपण पाहिले आहेत. पण, कोरोना महामारीत सुरु झालेला सोनू सूदचा मदतगार म्हणूनचा प्रवास अद्यापही सुरुच आहे. लॉकडाऊनमध्ये हजारो स्थलांतरित मजुरांसाठी दिवसरात्र खपणारा अभिनेता सोनू सूद अजून थकलेला नाही. लोकांच्या अपेक्षांवर खरा उतरत असल्याने, लोकंही त्याच्याकडूनच अपेक्षा करत आहेत. एका गावातील गावकऱ्यांनी चक्क माकड पकडण्याची साद सोनूला घातली होती, विशेष म्हणजे गावकऱ्यांची तीही अडचण सोनूने दूर केली आहे.

सोनू सूद गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या माध्यमातून तो लोकांना मदत करतोय. कधी कोणाचा उपचार करतोय तर कधी मुलांच्या शाळेची फी भरतोय. सोनू सूद आपल्या हाकेला ‘ओ’ देईल, याची लोकांना इतकी खात्री झालीय की लोक लहानमोठ्या समस्या, अडचणी त्याला सांगतात. कधी कधी तर लोक सोनू सूदकडे अशा मागणी करतात की, सोनूही कपाळावर हात मारून घेतो. एका गावातील काही ग्रामस्थांनी सोनूकडे गावातील वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी ट्विटरवरुन केली होती. बासु गुप्ता नामक ट्विटर युजरने सोनूकडे गावाची कैफियत मांडली होती. सोनूनेही ती कैफियत गंभीरतेने घेत, गावातील वानरांना पकडून दिलंय. 

सोनूने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. घ्या, आता वानरालाही पकडून दिलं. आता बोला... असे मजेशी ट्विट सोनू सूदने केलंय. सोनूने या ट्विटसोबत एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्यामध्ये, येथील वानराने गावातील काही जणांना जखमी केले होते, त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. तसेच, गावात वानराला पकडतानाचेही व्हिजूव्यल या व्हिडिओत दिसत आहेत. सोनूच्या सांगण्यावरुन या वानराला पकडून जंगलात सोडून देण्यात आले आहे.  

बासू गुप्ताचं ट्विट

‘सोनू सूद सर, आमच्या गावात एका वानराने उच्छाद मांडला आहे. त्याच्या हल्ल्यात डझनावर लोक जखमी झाले आहेत. या वानराला गावातून बाहेर दूर जंगलात नेऊन सोडावे, अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो,’ अशा शब्दांत बासु गुप्ताने आपली अडचण सांगितले. आपल्या पोस्टसोबत त्याने गावक-यांचा फोटोही जोडला. सोनू सूदच्या नजरेतून हे  ट्विट सुटले नाही. हे  ट्विट पाहिल्यानंतर अपेक्षेनुसार, लगेच सोनूने त्यावर उत्तर दिले. ‘बस अब बंदर पकडना ही बाकी रह गया था दोस्त, असे मजेशीर उत्तर त्याने दिले. इतक्यावरच सोनू थांबला नाही तर त्याने या गावक-यांना निराश न करता त्यांनाही मदतीचे आश्वासन दिले. पता भेज, यह भी करके देख लेते हैं, असे त्याने लिहिले.

सोनूचा 'किसान' येतोय

सोनू सूदने आत्तापर्यंत गरिब शेतक-यांना ट्रॅक्टर पाठवण्यापासून अनाथ मुलांना आश्रय देणे, शस्त्रक्रियेसाठी मदत करणे, घर बांधून देण्यापर्यंत अनेक प्रकारे लोकांची मदत केली आहे. वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सोनूने अलीकडे ‘किसान’ हा सिनेमा साईन केला आहे. यात तो लीड भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा ई निवास दिग्दर्शित करणार आहे.
 

Web Title: Video: An Sonu Sood catches a monkey in the net after requesting by villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.