Andhra Pradesh News:आंध्र प्रदेशातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर एका अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या स्कूटीवरुन जात असताना बसखाली चिरडल्याचे दिसते. हा अपघात इतका भयानक होता की, त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
संतुलन बिघडल्याने झाला भीषण अपघात
या अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्हीक कैद झाला आहे. बस आणि स्कूटी दोन्ही एकाच दिशेने जात असल्याचे यात दिसते. अचानक बसचा एक भाग स्कूटीला लागतो, ज्यामुळे स्कूटीस्वाराचे संतुलन बिघडले आणि तो थेट रस्त्यावर कोसळला. यानंतर लगेच बसचे मागचे चाक थेट त्याच्या अंगावर जाते. ही घटना इतक्या लवकर घडते की, कोणालाही काही समजण्याआधीच युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या अपघातानंतर तात्काल पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. ही दुर्घटना शहरातील व्यस्त भागात घडली. स्थानिक नागरिकांच्या मते, बसचालक अतिवेगाने गाडी चालवत होता आणि स्कूटीला ओव्हरटेक करताना हा अपघात झाला. अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
Web Summary : A tragic accident in Andhra Pradesh resulted in the death of a scooter rider after a bus collided with his vehicle. The CCTV footage shows the bus hitting the scooter, causing the rider to lose balance and fall under the bus's wheels. The bus driver fled the scene and is being sought by police.
Web Summary : आंध्र प्रदेश में एक दुखद दुर्घटना में बस ने स्कूटर को टक्कर मार दी, जिससे चालक की मौत हो गई। सीसीटीवी फुटेज में दिख रहा है कि बस ने स्कूटर को टक्कर मारी, जिससे चालक का संतुलन बिगड़ गया और वह बस के पहियों के नीचे आ गया। बस चालक मौके से फरार हो गया और पुलिस उसकी तलाश कर रही है।