VIDEO: विमान अपघातावेळी जीव वाचवण्याऐवजी प्रवाशांची सामान घेण्याची घाई

By admin | Published: August 4, 2016 01:06 PM2016-08-04T13:06:02+5:302016-08-04T13:09:30+5:30

एमिरेट्स एअरलाइन्सच्या विमानाचा अपघात होत असताना काही प्रवाशी आपला जीव वाचवण्याची घाई करण्यापेक्षा सामानाची जास्त काळजी करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे

VIDEO: Riding a baggage of passengers instead of saving lives during an accident | VIDEO: विमान अपघातावेळी जीव वाचवण्याऐवजी प्रवाशांची सामान घेण्याची घाई

VIDEO: विमान अपघातावेळी जीव वाचवण्याऐवजी प्रवाशांची सामान घेण्याची घाई

Next
ऑनलाइन लोकमत - 
दुबई, दि. 04 -  एमिरेट्स एअरलाइन्सच्या विमानाचा अपघात होत असताना काही प्रवाशी आपला जीव वाचवण्याची घाई करण्यापेक्षा सामानाची जास्त काळजी करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या व्हायरल होऊ लागला आहे. तिरूअनंतपुरम येथून दुबईला निघालेल्या एमिरेट्स एअरलाइन्सच्या बुधवारी विमानाचा दुबई विमानतळावर अपघात झाला. अपघात भीषण होता मात्र सुदैवाने विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. या विमानात २७५ प्रवासी आणि क्रू-मेंबर होते.
 
विमान अपघात होत असताना विमानामधील एक व्हिडिओ सध्या फेसबूकवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये प्रवासी लॅपटॉप म्हणून ओरडताना दिसत आहे. परिस्थितीचं भान नसलेले हे प्रवासी आपलं सामान जाग्यावर आहे की नाही ? हे पाहण्यासाठी धाव घेत असल्याचंही दिसत आहे. विमानातील क्रू प्रवाशांना आपातकालीन मार्गाचा वापर करुन बाहेर पडण्यासाठी सांगत होते. कर्मचारी आपलं सामान विसरुन बाहेर उडी मारण्याचं आवाहन करत असतानाही प्रवासी मात्र दुर्लक्ष करत असल्याचं या व्हिडिओत स्पष्ट दिसतं आहे. 
 
(दुबई विमानतळावर एमिरेट्सच्या विमानाला अपघात, २७५ प्रवासी सुखरूप)
 
अपघातानंतर विमानाला आग लागली होती, त्यामुळे स्फोट होण्याची शक्यता होती. परिस्थिती लक्षात घेता सर्व प्रवासी सुखरुप लवकरात लवकर विमानातून उतरावेत यासाठी प्रयत्न केले जात असताना प्रवाशांनी स्वत:च आपला जीव धोक्यात घातल्याच स्पष्ट दिसतं आहे.

 
एमिरेट्स एअरलाइन्सचे EK521 हे विमान तिरुअनंतपुरम येथून दुबईला निघाले होते. मात्र दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड करत असतानाच अपघात झाला आणि या विमानात आग लागली. येथील स्थानिक वेळेनुसार दुपारी १२.४५ च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात विमानाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, घटनास्थळी  अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने दाखल होत आग विझवल्याने मोठी जीवितहानी टळली. या दुर्घटनेनंतर विमाने मॅकटौम वा शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळवण्यात आली होती. 
 

Web Title: VIDEO: Riding a baggage of passengers instead of saving lives during an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.