शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Video: शहिदांना श्रद्धांजली वाहतानाच राडा, काँग्रेसच्या 2 कार्यकर्त्यांची हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 8:10 AM

चीनने सीमेवर आगळीक करून आपले २० जवान मारले. मोदी सरकारने देशाला विश्वासात न घेता माहिती दडवण्याचा प्रयत्न केला.

अजमेर - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने चीनसमोर सपशेल शरणागती पत्करली आहे. चीनने २० भारतीय जवानांना हालहाल करुन मारले तरीही मोदी सरकार गप्पच आहे. दुसरीकडे सारा देश कोरोनाच्या गंभीर संकटाचा सामना करत असताना सातत्याने पेट्रोल-डिझेल दरवाढ करुन जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचा उद्योग सुरु आहे, असे म्हणत काँग्रेसने देशभरात 'शहिदों को सलाम दिवस पाळला' आहे. देशातील विविध राज्यांत आणि जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. मात्र, राजस्थानमध्ये याच श्रद्धांजली कार्यक्रमाला गालबोट लागल्याचे पाहायला मिळाले. 

चीनने सीमेवर आगळीक करून आपले २० जवान मारले. मोदी सरकारने देशाला विश्वासात न घेता माहिती दडवण्याचा प्रयत्न केला. तसेच चीनी सैन्याने सीमा ओलांडली नाही अशी चीनला फायदा होणारी भूमिका घेऊन मोदींनी देशाचा तसेच आपल्या शहीद जवानांचा अपमान केल्याचे काँग्रेसने यापूर्वी म्हटले होते. लडाख सीमारेषेवरील तणावाचा आणि केंद्र सरकारच्या कुचकामी धोरणाबद्दल जाब विचारण्यासाठी काँग्रेसने देशव्यापी आंदोलन छेडले आहे. भारताच्या २० वीर शहीद जवानांप्रती आदरभावना व्यक्त करण्यासाठी काँग्रेसकडून २६ जूनला ‘शहिदों को सलाम’ दिवस पाळण्यात आला. 

देशभरात काँग्रेसने शहीज जवानांना आंदरांजली वाहिली, विशेष म्हणजे कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेने हे आंदोलन करण्यात आले. मात्र, राजस्थानमध्ये या श्रद्धांजली कार्यक्रमाला गालबोट लागल्याचे दिसून आले. अजमेर येथेही शहिदांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम सुरु होता. मात्र, त्याचवेळी दोन काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. तोंडाला मास्क लावून उपस्थित असलेल्या दोन युवकांमध्ये ही मारहाण झाली असून उपस्थितांनी वेळीच सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यत सोशल मीडियावर या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे, या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. दरम्यान, याच दिवशी #SpeakupForOurMartyrs  ही ऑनलाईन मोहीमही सोशल मीडियावर पाहायला मिळाली. काँग्रेसच्या या आंदोलनानंतर राहुल गांधींनी मोदींना प्रश्न केला आहे. 

संबंधित बातम्या

'मोदीजी घाबरू नका, चीननं जमिन बळकावल्याचं सत्य देशवासियांना सांगा'

टॅग्स :congressकाँग्रेसMartyrशहीदDeathमृत्यूBorderसीमारेषाchinaचीन