Video - घरातून ऑफिससाठी निघाला, लिफ्टची वाट पाहताना हार्ट अटॅक आला; काही सेकंदात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 12:58 IST2023-03-06T12:54:06+5:302023-03-06T12:58:18+5:30

तरुणांपासून ते वृद्धापर्यंत लोकांचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होत आहे.

Video person who left home for office died due to heart attack in few seconds | Video - घरातून ऑफिससाठी निघाला, लिफ्टची वाट पाहताना हार्ट अटॅक आला; काही सेकंदात मृत्यू

Video - घरातून ऑफिससाठी निघाला, लिफ्टची वाट पाहताना हार्ट अटॅक आला; काही सेकंदात मृत्यू

सध्या सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. जे पाहिल्यानंतर युजर्सना मोठा धक्का बसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हि़डीओमध्ये एखादी व्यक्ती लग्नात, मंदिरात, नाचताना, चालताना जीव गमावत आहे. अशा मृत्यूमुळे सर्वांचच टेन्शन वाढलं आहे.. नुकताच असाच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला आहे. 

तरुणांपासून ते वृद्धापर्यंत लोकांचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होत आहे. नुकतेच डीजेच्या आवाजामुळे नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे दिसले, तर लग्नाच्या रिसेप्शनमध्ये नाचताना 19 वर्षाखालील तरुणाचा अचानक मृत्यू झाला. अशा परिस्थितीत आता समोर आलेला व्हिडीओ युजर्सची चिंता आणखी वाढवत आहे.

सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पोस्ट केला जात आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर @ajaychauhan41 नावाच्या प्रोफाइलसह शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती घरातून तयार होऊन ऑफिसला निघताना दिसत आहे. त्याच्या हातात एक पिशवीही दिसत आहे. त्यानंतर तो लिफ्टजवळ जातो, बटण दाबतो आणि लिफ्टची वाट पाहू लागतो. याच दरम्यान त्यांची तब्येत बिघडू लागते.

व्य़क्तीला याच दरम्यान चक्कर येते आणि खाली पडून त्याचा मृत्यू होतो. ही संपूर्ण घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हे बघून आता सोशल मीडिया युजर्स चांगलेच हैराण झाले आहेत. हार्ट अटॅकमुळे व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. याआधी देखील अशा अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Video person who left home for office died due to heart attack in few seconds