VIDEO: राखी पौर्णिमेच्या दिवशीच बहिणीवर दुःखाचा डोंगर; मृत भावाच्या हातावर बांधली राखी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 19:43 IST2023-08-31T19:42:15+5:302023-08-31T19:43:02+5:30

राखी पौर्णिमेच्या दिवशीच भावाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, यानंतर बहिणीने मृत भावाच्या हातावर राखी बांधली.

VIDEO: On the day of Rakhi Purnima man died, sister tied rakhi on dead brother's hand | VIDEO: राखी पौर्णिमेच्या दिवशीच बहिणीवर दुःखाचा डोंगर; मृत भावाच्या हातावर बांधली राखी...

VIDEO: राखी पौर्णिमेच्या दिवशीच बहिणीवर दुःखाचा डोंगर; मृत भावाच्या हातावर बांधली राखी...

हैदराबाद : राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन, हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बहिण आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी बांधते. पण, तेलंगणामध्येरक्षाबंधनाचा दिवस एका बहिणीसाठी सर्वात वाईट दिवस ठरला. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधण्यासाठी आलेल्या बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळला. 

पोड्डापल्ली जिल्ह्यात एका व्यक्तीचा रक्षाबंधनाच्या दिवशीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यानंतर त्या व्यक्तीच्या बहिणीने रडत रडत आपल्या मृत भावाच्या हातात राखी बांधली. या घटनेचा हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चौधरी कनकैय्या असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला रडत रडत आपल्या मृत भावाला राखी बांधताना दिसत आहे. राखी बांधल्यानंतर ती साश्रू नयनाने आपल्या भावाला अखेरचा निरोप देते. व्हायरल व्हिडीओमध्ये कनकैय्या यांची पत्नी आणि कुटुंबातील इतर सहस्यही रडताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पानावतील. व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Web Title: VIDEO: On the day of Rakhi Purnima man died, sister tied rakhi on dead brother's hand