शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

Video: नरेंद्र मोदी म्हणजे आधुनिक औरंगजेब, संजय निरुपमांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 10:21 IST

वाराणसीमध्ये कॉरिडोरच्या नावाखाली शेकडो मंदिरे उद्धवस्त करण्यात आली. नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यानंतर बाबा विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी पैसै आकारण्यात येत आहे.

वाराणसी - वाराणसीमध्ये कॉरिडोरच्या नावाखाली शेकडो मंदिरे उद्धवस्त करण्यात आली. नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यानंतर बाबा विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी पैसै आकारण्यात येत आहे. औरंगजेब काशीच्या गल्लीबोळात अत्याचार करण्यासाठी उतरला होता. हिंदूची मंदिरे तोडली जात होती तेव्हा हिंदू लोकांनी विरोध केला होता. जे काम औरंगजेब करु शकला नाही ते काम नरेंद्र मोदी करत आहेत. नरेंद्र मोदी औरंगजेबाचे आधुनिक अवतार आहेत अशी टीका काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केली आहे. वाराणसी येथे एका कार्यक्रमात बोलताना निरुपम यांनी मोदींवर हल्लाबोल केला. 

यावेळी बोलताना संजय निरुपम म्हणाले की, बाबा विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी 550 रुपयांचा कर आकारला जातो. हिंदू रक्षण करण्याचा दावा करणारे मोदी काशीमध्ये मंदिरे तोडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अहंकार आहे. काशीची संस्कृती हिंदू लोकांनी औरंगजेबापासून वाचवली होती. आज औरंगजेबाचे काम नरेंद्र मोदी करत आहे असं निरुपम यांनी सांगितले. 

भाजपावाले नेहमी खोटं बोलून चुकीच्या गोष्टी लोकांपर्यंत पसरवण्याचं काम करतात. मनमोहन सिंग सरकारमध्येही सर्जिकल स्ट्राईक झाले होते. काँग्रेसच्या शासनकाळातही सैन्य पाकिस्तानात घुसलं होतं. मोदी याचं राजकारण करत आहेत असा आरोप संजय निरुपम यांनी केला. तर देशाचे संरक्षणमंत्री, परराष्ट्र मंत्री आणि रेल्वेमंत्री निवडणूक लढवत नाहीत. त्यांच्याजागी सनी देओल, साध्वी प्रज्ञा ठाकूर, मनोज तिवारी अशांना भाजपाकडून निवडणूक लढवावी लागत आहे. जर देशात मोदींची लाट असती तर निर्मला सितारामन, सुषमा स्वराज, पियुष गोयल यांनी निवडणूक लढवली असती असा टोला निरुपम यांनी भाजपाला लगावला. तसेच प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्या ताकदीमुळे भाजपामध्ये भितीचं वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक फेक व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल केले जात आहे असं निरुपम यांनी सांगितले.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्यावर केलेल्या विधानामुळे अमेठी लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार स्मृती ईराणी जवळपास अडीच लाख मतांनी पराभूत होणार हे निश्चित करण्याचं काम मोदींनी केलं असा दावा संजय निरुपम यांनी केला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSanjay Nirupamसंजय निरुपमcongressकाँग्रेसBJPभाजपा