उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील एका रेस्टॉरंटमध्ये रविवारी रात्री भीषण आग लागली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. आग लागल्यानंतर एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट झाला.
मुरादाबाद जिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. जुनैद असारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "एकूण सात रुग्णांना रुग्णालयात आणण्यात आलं. त्यापैकी एक असलेल्या ५६ वर्षीय माया यांचा मृत्यू झाला. तर उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर आहे" अग्निशमन विभागाला रात्री १० वाजताच्या सुमारास आगीची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग नियंत्रणात आणली.
मुरादाबादचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजीव कुमार पांडे म्हणाले, आम्हाला रात्री १० वाजताच्या सुमारास क्लार्क्स इन हॉटेलसमोरील एका रेस्टॉरंटमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. सुरुवातीला दोन अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या होत्या, परंतु चार सिलिंडर फुटल्यामुळे आग वेगाने पसरली. घटनास्थळी सात अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत आणि आणखी गाड्यांना बोलावण्यात आलं."
१६ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं, ज्यात चार महिला, दोन मुलं आणि एक कुत्रा आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मुरादाबादचे एसपी सिटी कुमार रणविजय सिंह म्हणाले, ही घटना कटघर पोलीस स्टेशन परिसरात घडली. आगीच्या वेळी रेस्टॉरंटमध्ये सुमारे १५-१६ लोक उपस्थित होते. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आणि रुग्णालयात नेण्यात आलं. काहींवर उपचार सुरू आहेत.
Web Summary : A major fire broke out at a restaurant in Moradabad, Uttar Pradesh, resulting in one death and several injuries. Four cylinders exploded, intensifying the blaze. Firefighters rescued 16 people, including children and a dog. The cause of the fire is under investigation.
Web Summary : मुरादाबाद, उत्तर प्रदेश में एक रेस्टोरेंट में भीषण आग लगने से एक महिला की मौत हो गई और कई घायल हो गए। चार सिलेंडरों में विस्फोट से आग और भड़क गई। दमकल कर्मियों ने बच्चों और एक कुत्ते सहित 16 लोगों को बचाया। आग लगने के कारणों की जांच जारी है।