Video - अग्नितांडव! मध्य प्रदेशातील फटाक्यांच्या फॅक्ट्रीत भीषण स्फोट; 7 जणांचा मृत्यू, 60 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 13:52 IST2024-02-06T12:33:06+5:302024-02-06T13:52:23+5:30

हरदा जिल्ह्यात एका फटाक्यांच्या फॅक्ट्रीत भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या फॅक्ट्रीत अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Video madhya pradesh harda firecracker factory massive explosion many people trapped | Video - अग्नितांडव! मध्य प्रदेशातील फटाक्यांच्या फॅक्ट्रीत भीषण स्फोट; 7 जणांचा मृत्यू, 60 जखमी

Video - अग्नितांडव! मध्य प्रदेशातील फटाक्यांच्या फॅक्ट्रीत भीषण स्फोट; 7 जणांचा मृत्यू, 60 जखमी

मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात एका फटाक्यांच्या फॅक्ट्रीत भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी झाले आहेत. या फॅक्ट्रीत अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरदा येथील बैरागड येथील फटाक्यांच्या फॅक्ट्रीत हा स्फोट झाला. अनेक लोक आत अडकल्याची शक्यता आहे, त्यांना वाचवण्यासाठी एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. 

जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकाही पोहोचल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

फटाक्यांची फॅक्ट्री असल्यामुळे आग सतत भडकत आहे. यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फॅक्ट्रीमध्ये किती लोक अडकले आहे याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. 


 

Web Title: Video madhya pradesh harda firecracker factory massive explosion many people trapped