Video: अल्पवयीन मुलीवर 7 महिने बलात्कार करणाऱ्या आरोपींची कोर्टात वकिलांकडून धुलाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 18:03 IST2018-07-17T18:03:07+5:302018-07-17T18:03:30+5:30

कोर्ट परिसरात 18 आरोपींना जबर मारहाण

Video: Lawyer attorneys for raping minor girl for seven months | Video: अल्पवयीन मुलीवर 7 महिने बलात्कार करणाऱ्या आरोपींची कोर्टात वकिलांकडून धुलाई

Video: अल्पवयीन मुलीवर 7 महिने बलात्कार करणाऱ्या आरोपींची कोर्टात वकिलांकडून धुलाई

चेन्नई: अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 18 जणांना चेन्नईतील कोर्टात मारहाण करण्यात आली आहे. न्यायालय परिसरातील वकिलांनी ही मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. चेन्नईतील एका इमारतीमध्ये 11 वर्षांच्या मुलीवर सात महिन्यांपासून तब्बल 18 जणांकडून सामूहिक बलात्कार सुरू होता. यामध्ये इमारतीच्या सुरक्षा रक्षकाचाही समावेश होता. 

अकरा वर्षीय मुलीवर सात महिने बलात्कार केल्याच्या आरोपाखाली चेन्नईत 18 जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये इमारतीचा सुरक्षा रक्षक, लिफ्टमॅन आणि पाणी पुरवठादाराचाही आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला गुंगीचे औषध, अंमली पदार्थ शीतपेयांमध्ये मिसळून पाजण्यात येत होतं. शिवाय, कोणाकडेही याबाबतची वाच्यता करायची नाही, यावरुन हे नराधम तिला धमकावतही होते. या घटनेची माहिती कोणालाही दिल्यास बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल करु, अशी धमकी आरोपींकडून दिली जात होती. 





सात महिन्यांपासून पीडित मुलीवर बलात्कार सुरू होता. अखेर पीडित मुलीनं आपल्या मोठ्या बहिणीकडे घडलेला प्रकार सांगितल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. यानंतर तिच्या पालकांनी पोलिसात तक्रार केली. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले की, पीडित मुलीच्या आईनं दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे आम्ही गुन्हा नोंदवला आहे. इमारतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी इमारतीमधील वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन मुलीवर लैंगिक अत्याचार केलेत.

Web Title: Video: Lawyer attorneys for raping minor girl for seven months