Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 10:56 IST2025-08-06T10:56:04+5:302025-08-06T10:56:32+5:30
एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो बघितल्यावर तुम्ही देखील हेल्मेट घालण्यास टाळाटाळ करणं सोडून द्याल.

Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल!
Bike Accident Viral Video : अनेकांना दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं टाळण्याची सवय असते. इथेच तर जायचं आहे, नाक्यावर पोलीस नसणार आणि अशीच काही तत्सम कारण देऊन लोक हेल्मेट घालण्यास टाळाटाळ करतात. पण, आता एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो बघितल्यावर तुम्ही देखील हेल्मेट घालण्यास टाळाटाळ करणं सोडून द्याल. या व्हिडीओमध्ये एक दुचाकीस्वराचा अपघात झाल्याचे दिसले आहे. मात्र, या अपघातात तो कसा थोडक्यात बचावला हे पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओमध्ये, एक मुलगा शहरातील एका सिग्नलवर उभा आहे आणि त्याच्या मागे दोन मुली त्याच्या बाईकवर बसल्या आहेत, सर्वकाही सामान्य दिसते. पण, तितक्यात लाल सिग्नल लागतो. म्हणून हा व्यक्ती आपली बाईक थांबवतो. पण, नंतर एक ट्रक येतो आणि पुढे जे घडते ते बघून नक्कीच अंगाचा थरकाप होईल. पण, या सगळ्यातही त्याच्या हेल्मेटने मोठी कामगिरी केली आहे.
सिग्नल लागला, गाडी थांबली अन्...
सिग्नल लाल झाल्यावर बाईक थांबते. तेवढ्यात एक जड ट्रॉली म्हणजेच एक मोठा ट्रक तिथून वळू लागतो. वळण घेत असताना, ट्रॉलीचा मागचा भाग बाईकला हलकासा स्पर्श करतो, ज्यामुळे बाईक अडखळते, पडते आणि ट्रकखाली जाते, ज्यामुळे ती अनियंत्रित होते. यानंतरचे दृश्य तुम्हालाही हादरवून टाकेल.
Happy that the guy survived but he needs to get his reflexes checked.
— Rohan Dogra (@rohan__dogra) August 5, 2025
बाईकवर बसलेल्या दोन्ही मुली कसातरी स्वतःचा जीव वाचवून तिथून निघून जातात. पण बाईक चालवणारा मुलगा थेट ट्रकखाली जातो. मग ट्रकचे मागचे चाक त्याच् डोक्यावरून जाते, पुढच्याच क्षणी असे वाटते की चाक त्याचे डोके चिरडणार आहे. पण हेल्मेटच्या ताकदीमुळे त्याचा जीव वाचतो. दरम्यान, जवळ उभे असलेले लोक ओरडू लागतात. चालकालाही काहीतरी गडबड आहे हे समजते. तो लगेच ट्रक थांबवतो. तिथे उभे असलेले लोक धावत येतात आणि कसे तरी त्या तरुणाला ट्रकखालून बाहेर काढतात. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.