अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 15:41 IST2025-12-18T15:41:12+5:302025-12-18T15:41:51+5:30
Video - एका नॅशनल हायवेवर वेगाने जाणारी ह्युंदाई क्रेटा कार दिसत आहे. त्याच वेळी स्कूटी घेऊन एक व्यक्ती रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतो.

अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
हायवे ओलांडताना नेहमी नीट लक्ष दिलं पाहिजे, कारण दुसऱ्या बाजूने येणारं वाहन आपल्याला धडक देणार नाही. रस्ता नीट ओलांडण्याचा सल्ला हमखास दिला जातो. याच दरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका नॅशनल हायवेवर वेगाने जाणारी ह्युंदाई क्रेटा कार दिसत आहे. त्याच वेळी स्कूटी घेऊन एक व्यक्ती रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतो.
स्कूटीवर मागे एक प्रवासीही बसलेला असतो आणि दोघांनीही हेल्मेट घातलेले नाही. आपण आरामात रस्ता ओलांडू असं स्कूटी चालवणाऱ्याला वाटतं, परंतु कारचा वेगही प्रचंड असल्याने चालकाला ब्रेक दाबण्याची संधीच मिळत नाही. ही धडक इतकी जोरदार असते की स्कूटी चालक दूर फेकला जातो, तर मागे बसलेली व्यक्ती स्कूटीसोबत फरफटत जाते. यावेळी जवळ उभा असलेला एक व्यक्तीही या अपघातात जखमी होतो.
Ahmedabad SUV Crashes into Scooter at Zebra Crossing, Hits Bystander
— Sumit (@SumitHansd) December 18, 2025
The scooter, loaded with two helmetless riders and unsecured iron rods, suddenly turned across the Creta's path over rumble strips at the zebra crossing.
a typical scooter riding dickhead (without helmet) pic.twitter.com/c0TuvIiWUy
चूक नक्की कोणाची?
या प्रकरणात कोणत्याही एका व्यक्तीला पूर्णपणे दोषी ठरवता येणार नाही. कार चालकाने क्रॉसिंगजवळ वेग कमी ठेवायला हवा होता आणि अधिक सतर्क राहायला हवं होतं. परंतु, स्कूटी चालवणाऱ्याचीही चूक अधिक गंभीर मानली जात आहे. त्याने न थांबता हायवे ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि साधारण ४५ डिग्री अँगल चुकीच्या दिशेने पुढे गेला, ज्यामुळे कार चालकाला सावरायला खूप कमी वेळ मिळाला.
अपघातानंतर काय झालं?
धडकेनंतर स्कूटी चालवणारा गंभीर जखमी झाल्याचं दिसत आहे. त्याला हालचाल करणंही अवघड झालं, पण तो स्वतःहून उभा राहू शकत नव्हता. कारचे एअरबॅग्ज उघडल्यामुळे कार तिथेच थांबली. कारमधील प्रवासी सुरक्षित बाहेर आले आणि त्यांना कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. हा व्हिडिओ एक्स (X) वर 'नक्की चूक कोणाची?' या कॅप्शनसह पोस्ट करण्यात आला आहे. काही युजर्सनी स्कूटी चालवणाऱ्याला जबाबदार धरलं आणि म्हटलं की, हायवेच्या मध्यभागी अशा प्रकारे कट मारणं म्हणजे जीवाशी खेळण्यासारखं आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ जोरदार व्हायरल
काही लोकांनी कार चालकाला दोषी ठरवलं, कारण तिथे झेब्रा क्रॉसिंग होतं आणि अशा ठिकाणी वेग कमी असणं अत्यंत आवश्यक होतं. अनेकांचं असं मत आहे की दोन्ही बाजूने चूक झाली आहे. एकाचा अतिवेग आणि दुसऱ्याचा निष्काळजीपणा यामुळे हा भीषण अपघात घडला. सध्या स्कूटी चालवणारा आणि त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीच्या प्रकृतीबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.