Video: ... अन् क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर तुमच्या कँटीनवर चहा अन् टोस खातो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 01:11 PM2022-11-03T13:11:59+5:302022-11-03T13:23:41+5:30

सचिन तेंडुलकर आपल्या मुलासमवेत गोव्याच्या दिशेने जात होता.

Vide: ... and when the god of cricket Sachin Tendulkar eats tea and toss at your canteen of belgaon goa road | Video: ... अन् क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर तुमच्या कँटीनवर चहा अन् टोस खातो

Video: ... अन् क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर तुमच्या कँटीनवर चहा अन् टोस खातो

googlenewsNext

मास्टरब्लास्टर, प्रख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सध्या अनेक दौऱ्यावर असल्याचं दिसून येतं. दोन दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकरने अचानक नृसिंहवाडीत श्री दत्त मंदिरामध्ये हजेरी लावली. विशेष म्हणजे पहाटे पाच वाजता काकड आरतीला उपस्थित राहून परत मुंबईला रवाना झाला. त्यानंतर, आता सचिनचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये, क्रिकेटचा देव बेळगाव-गोवा मार्गावर एका चहाच्या कँटीनमध्ये जाऊन चहा अन् टोस खात असल्याचं दिसून येतं. ज्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरलेले असतात, तो चक्क आपल्या कँटीनमध्ये येऊन चहा पितो, हा शब्दात न व्यक्त होण्यासारखा आनंद आहे. 

सचिन तेंडुलकर आपल्या मुलासमवेत गोव्याच्या दिशेने जात होता. या प्रवासादरम्यान बेळगाव येथे सचिनने एका कँटीनवर चहा पिला. त्यावेळी, उपस्थितांसोबत चर्चाही केली. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरने स्वत: कँटीनमधील मुलासोबत सेल्फी काढला, त्याच्या हातात हात दिला. ज्या सचिन तेंडुलकरची एक झलक पाहण्यासाठी चाहते मोठा आटापिटा करत असतात, तो मास्टर ब्लास्टर तेंडुलकर चक्क तुमच्या कँटीनवर येऊन चहा पितो अन् तुमचा आनंद गगनात मावेनासा होतो. सचिनने येथील कँटीनवर चहासोबत टोसही खाल्ला आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन त्याने यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला. आत्तापर्यंत १० लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. 

दरम्यान, सचिनने दोन दिवसांपूर्वी रात्री कोल्हापुरी पाहुणचार घेवून मुक्काम करून पहाटे चार नंतर नृसिंवाडीत दर्शन घेतले होते. नृसिंहवाडीत श्री दत्त मंदिरामध्ये हजेरी लावली. सचिनने पहाटे पाच वाजता काकड आरतीला उपस्थित राहून श्री दत्त चरणी प्रार्थना केली. मुलगा अर्जुन तेंडुलकर याला भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळावे यासाठी सचिनने श्री दत्त चरणी साकडे घातले.

Web Title: Vide: ... and when the god of cricket Sachin Tendulkar eats tea and toss at your canteen of belgaon goa road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.