शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ- चंद्रपूर वीज केंद्र

By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST

चंद्रपूर वीज केंद्रातील निर्माणाधीन संचाच्या कुलिंग टॉवरला आगचंद्रपूर वीज केंद्रातील निर्माणाधीन संचाच्या कुलिंग टॉवरला आग लाखो रुपयांचे नुकसान : संच सुरु होण्यास लागणार आणखी कालावधीफोटो ओळफोटो क्र.-०९सीपीपी १९ - वीज केंद्रातील नवव्या क्रमांकाच्या संचाला आग लागल्यानंतर असा धूर निघत होता.दुर्गापूर(चंद्रपूर) : येथील वीज केंद्राच्या विस्तारीत प्रकल्पातील नवव्या संचाचे बांधकाम अंतिम ...


चंद्रपूर वीज केंद्रातील निर्माणाधीन संचाच्या कुलिंग टॉवरला आग

चंद्रपूर वीज केंद्रातील निर्माणाधीन संचाच्या कुलिंग टॉवरला आग

लाखो रुपयांचे नुकसान : संच सुरु होण्यास लागणार आणखी कालावधी

फोटो ओळ
फोटो क्र.-०९सीपीपी १९ - वीज केंद्रातील नवव्या क्रमांकाच्या संचाला आग लागल्यानंतर असा धूर निघत होता.

दुर्गापूर(चंद्रपूर) : येथील वीज केंद्राच्या विस्तारीत प्रकल्पातील नवव्या संचाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असताना सोमवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान येथील कुलींग टॉवरमध्ये काम सुरु असताना अचानक आग लागली. यामुळे संबंधित कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे संच सुरु होण्यास आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
चंद्रपूर वीज निर्मिती केंद्रात ५०० मेगॉवॅटच्या दोन नव्या संचाचे बांधकाम सुरू आहे. त्यापैकी नवव्या संचाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. सोमवारी सकाळी या संचाच्या कुलींग टॉवरमध्ये आतुन फिन्स नावाचे पॉलीमर मटेरियल लावण्याचे काम सुरू होते. सदर काम मे बीजीआर या मुख्य कंपनीने हाईग्रीवा या कंपनीला पेटी कंत्राट दिले आहे. या कंपनीतील कर्मचारी संचाच्या आत काम करीत असताना अचानक आगीचे लोळ दिसले. संचाच्या अगदी शेजारी अशाच मटेरियलचा मोठ्या प्रमाणात साठा ठेवण्यात आला होता. आगीचे स्वरुप बघता लगेच साठा हटविण्यात आला. त्यामुळे मोठी वित्त हानी टळली. आग विझविण्यासाठी वीज केंद्रातील चार तथा महानगरपालिकेची एक गाडी पोहचली. त्यानंतर काही वेळातच ही आग आटोक्यात आली. या आगीत संबंधित कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, नवव्या संचाचे काम अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसातच संच सुरु होणार होता. अशातच आता कुलिंग टॉवरला आग लागल्याने परत काम करावे लागणार आहे. त्यामुळे हा संच सुरू होण्यास आणखी विलंब होणार आहे.
येथे कार्यरत कंपन्या मंदगतीने संच निर्मितीचेे काम करीत आहे. त्यामुळेे अपेक्षीत अवधीपेक्षा संच सुरू होण्यास बराच विलंब झाला आहे. कसे बसे काम पूर्ण करण्याच्या प्रयत्नात येथे सुरक्षेला बगल दिल्या जात आहे. (वार्ताहर)