नोटाबंदीच्या यज्ञात सामान्यांचा बळी, राहुल गांधींचा घणाघात

By Admin | Updated: December 28, 2016 10:50 IST2016-12-28T10:50:51+5:302016-12-28T10:50:51+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या यज्ञात सर्वसामान्यांचा बळी दिला जात आहे, असा घणाघात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे

Victim of bullet injuries, Rahul Gandhi's assault | नोटाबंदीच्या यज्ञात सामान्यांचा बळी, राहुल गांधींचा घणाघात

नोटाबंदीच्या यज्ञात सामान्यांचा बळी, राहुल गांधींचा घणाघात

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 28 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या यज्ञात सर्वसामान्यांचा बळी दिला जात आहे, असा घणाघात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 132व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नोटाबंदी निर्णयावरुन पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. 
 
'पंतप्रधान मोदी म्हणतात की काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात एक यज्ञ करत आहे, मात्र देशातील अतिश्रीमंत लोकांसाठी नोटाबंदीचा यज्ञ सुरू आहे', अशी टीका राहुल गांधी यांनी केली. तसेच यज्ञात कोणाचा तरी बळी दिला जातो, या यज्ञात सर्वसामान्य माणसाचा बळी दिला जात असल्याचा घणाघातही राहुल गांधी यांनी केली. 
(नोटाबंदीनंतर परदेशी पर्यटकांच्या संख्येत मात्र लक्षणीय वाढ)
दरम्यान, राहुल गांधी यांनी नोटाबंदी निर्णयावरुन केलेल्या आरोपांना आतापर्यंत जवळपास सर्वच टीकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या यज्ञ टीकेला पंतप्रधान मोदी काय उत्तर देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 
 

Web Title: Victim of bullet injuries, Rahul Gandhi's assault