शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

R Hari Kumar Navy Chief: व्हाईस अ‍ॅडमिरल आर हरी कुमार नवे नौदल प्रमुख, ३० नोव्हेंबर रोजी स्वीकारणार पदभार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2021 11:49 PM

व्हाईस अ‍ॅडमिरल आर हरी कुमार हे वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ आहेत. ३० नोव्हेंबर रोजी ते आपला कार्यभार सांभाळतील.

व्हाईस अ‍ॅडमिरल आर हरी कुमार (R Hari Kumar) हे नवे नौदल प्रमुख असतील. केंद्र सरकारनं त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. सध्या ते वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ आहेत. ते ३० नोव्हेंबर रोजी नौदल प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारतील. संरक्षण मंत्रालयानं यासंदर्भातील माहिती दिली आहे.

वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हाईस अॅडमिरल आर. हरी कुमार यांच्याकडे नौदल प्रमुख पदाची सूत्र सोपवण्यात येणार असल्याची मंगळवारी रात्री घोषणा करण्यात आली. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार विद्यमान नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग (Admiral Karambir Singh) रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. याच दिवशी आर. हरी कुमार हे आपला पदभार स्वीकारतील. १२ एप्रिल १९६२ रोजी आर हरी कुमार यांचा जन्म झाला. त्यांना जानेवारी १९८३ मध्ये नौदलाच्या कार्यकारी शाखेत नियुक्ती देण्यात आली. त्यांनी निरनिराळ्या कमांड, स्टाफ आणि इंट्रक्शनल अपॉइंटमेंट्समघ्ये आपली सेवा बजावली आहे. ते 'सी कमांड' (Sea Command) मध्ये आयएनएस निशंक, मासाईल कार्व्हेट, आयएनएस कोरा आणि गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर आयएनएस रणवीर सामील आहे. त्यांनी भारतीय नौदलाची विमानवाहू युद्धनौका INS विराटचंही नेतृत्व केलं आहे.

शील वर्धन सिंग CISF प्रमुखदरम्यान, भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी शीलवर्धन सिंग आणि अतुल करवाल यांची मंगळवारी अनुक्रमे सीआयएफ (CISF) आणि एनडीआरएफचे (NDRF) प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. सिंग हे बिहार केडरचे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत आणि सध्या ते इंटेलिजन्स ब्युरोमध्ये विशेष संचालक म्हणून कार्यरत आहेत.

टॅग्स :indian navyभारतीय नौदलDefenceसंरक्षण विभाग