संथारा व्रत परंपरेचे विहिंपकडून समर्थन
By Admin | Updated: August 20, 2015 23:14 IST2015-08-20T23:14:24+5:302015-08-20T23:14:24+5:30
जैन समाजात शतकानुशतके चालत आलेल्या संथारा व्रत परंपरेचे विहिंपने समर्थन केले आहे. स्वेच्छेने उपवास करीत मरण पत्करण्यासाठी केल्या जाणाऱ्या या व्रतावर

संथारा व्रत परंपरेचे विहिंपकडून समर्थन
जयपूर : जैन समाजात शतकानुशतके चालत आलेल्या संथारा व्रत परंपरेचे विहिंपने समर्थन केले आहे. स्वेच्छेने उपवास करीत मरण पत्करण्यासाठी केल्या जाणाऱ्या या व्रतावर आणलेल्या बंदीबाबत राजस्थान उच्च न्यायालयाने फेरविचार करावा, अशी विनंती विहिंपचे प्रदेशाध्यक्ष नरपतसिंग शेखावत यांनी गुरुवारी येथे पत्रपरिषदेत केली.
जैन मुनी मोक्ष आणि पुनर्जन्म मिळविण्यासाठी संथारा हे व्रत करतात. ती आत्महत्या नसते. २५०० वर्षांपूर्वी भगवान महावीरांच्या काळापासून ही परंपरा चालत आली आहे, असे ते म्हणाले. आम्ही उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो; मात्र जैन समाजाच्या यावरील युक्तिवादाविनाच हा निर्णय देण्यात आल्यामुळे त्याचा फेरविचार व्हावा, असे त्यांनी नमूद केले.
मूक मार्चमध्ये सहभाग
जैन समाजाने २४ आॅगस्ट रोजी राजस्थानमध्ये मूक मार्च आयोजित केला असून त्याला विहिंपचे समर्थन राहणार काय? यावर शेखावत म्हणाले की, आम्ही या आंदोलनात सहभागी होणार आहोत. (वृत्तसंस्था)