शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

शपथ घेण्याआधीच कुमारस्वामींची डोकेदुखी सुरू; वीरशैव महासभेच्या 'या' मागणीने केला घोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 12:00 PM

लिंगायत नेत्याला उपमुख्यमंत्रिपद द्या, अशा आशयाचं पत्र अखिल भारतीय वीरशैव महासभेनं कुमारस्वामींना लिहिलं आहे.

बंगळुरू- कर्नाटकातील सत्तासंघर्षांचा पेच काही सुटता सुटत नाहीये. कुमारस्वामी यांच्या शपथविधीआधीच नवा घोळ निर्माण झालाय. लिंगायत नेत्याला उपमुख्यमंत्रिपद द्या, अशा आशयाचं पत्र अखिल भारतीय वीरशैव महासभेनं कुमारस्वामींना लिहिलं आहे. त्यामुळे नवा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कुमारस्वामी बुधवारी (23 मे) रोजी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.कर्नाटकात एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारच्या सत्तावाटपाचा फॉर्म्युला जवळपास तयार झाला असून, त्यानुसार जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे 13 मंत्री व काँग्रेसचे 20 मंत्री बुधवारी शपथ घेतील, हे निश्चित मानले जात आहे. शपथविधीनंतर आपण 24 तासांतच बहुमत सिद्ध करू, असा दावा कुमारस्वामी यांनी केला आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी 15 दिवसांचा अवधी दिला आहे.कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष जी. परमेश्वर यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणे नक्की आहे. तसेच काँग्रेस फोडण्याची येडियुरप्पांची खेळी उधळून लावणारे डी. के. शिवकुमार यांचेही मंत्रिमंडळातील स्थान नक्की आहे. कुमारस्वामींच्या पक्षाकडे वित्त खाते, तर काँग्रेसकडे गृह खाते राहील, असे सध्याचे चित्र आहे. हीच दोन अतिशय महत्त्वाची खाती मानली जातात. काँग्रेसकडून अधिकाधिक लिंगायत आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असा अंदाज आहे. येडियुरप्पा यांचे भविष्यातील डाव यशस्वी होऊ नयेत, यासाठीच हे केले जाईल .बसपा, एक अपक्ष व एक मुस्लीम आमदारही सरकारमध्ये असेल. 

सरकार चालवणे, ही आमची जबाबदारीकाँग्रेसच काही काळाने हे सरकार पाडेल, असे भाजपा नेते सांगत आहेत. पण सरकारने आपला काळ पूर्ण करावा, असे आमचे प्रयत्न राहतील, असे सांगून काँग्रेस नेता म्हणाला की, सध्या भाजपाविरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी राहुल गांधी प्रयत्नशील आहेत. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुकाही आहेत. यामुळे सरकार पाडण्याचे प्रयत्न वा सरकार पडेल, अशी कृती काँग्रेसकडून होणार नाही.अडीच वर्षांचा फॉर्म्युला नाहीच : कुमारस्वामीमुख्यमंत्रीपद अडीच वर्षे कुमारस्वामी यांच्याकडे राहील आणि नंतर ते काँग्रेसकडे जाईल, अशा बातम्या शनिवारपासून पसरल्या होत्या. पण तसे घडणार नाही आणि आपणच पूर्ण काळ मुख्यमंत्री राहू, असे कुमारस्वामी यांनी व काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८kumarswamyकुमारस्वामी