Video: स्वयंपाक करताना सिलेंडरचा भीषण स्फोट; सख्ख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू, आई गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 14:06 IST2026-03-24T14:04:51+5:302026-03-24T14:06:56+5:30

Varanasi Cylinder Blast: स्फोट इतका भीषण होता की, अख्खे घर पत्त्याप्रमाणे कोसळले.

Varanasi Cylinder Blast: Cylinder explodes while cooking; siblings died, mother critical | Video: स्वयंपाक करताना सिलेंडरचा भीषण स्फोट; सख्ख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू, आई गंभीर जखमी

Video: स्वयंपाक करताना सिलेंडरचा भीषण स्फोट; सख्ख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू, आई गंभीर जखमी

Varanasi Cylinder Blast: उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे घरगुती गॅस गळती झाल्याने मोठा स्फोट झाला. या स्फोटात अख्ख घर जमीनदोस्त झाले. या दुर्घटनेत सख्ख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू झाला असून, आईसह एक जण गंभीर जखमी आहे. 

गॅस गळतीदरम्यान चूल पेटवल्याने स्फोट

ही घटना वाराणसीतील लहरतारा भागात घडली. घरातील सिलेंडरमधून गॅस लीक होत होता. यादरम्यान, स्वयंपाकासाठी आग लावताच जोरदार स्फोट झाला आणि घर पूर्णपणे जमीनदोस्त झाले. स्फोट इतका तीव्र होता की, संपूर्ण घर काही क्षणांत पत्त्यांच्या घरासारखे कोसळले. या घटनेत घरातील सर्व सदस्य ढिगाऱ्याखाली अडकले.

चार जणांना बाहेर काढले

स्फोटाचा आवाज ऐकून परिसरातील लोक तात्काळ घटनास्थळी धावले आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी मिळून बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चार जणांना बाहेर काढून तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून 28 वर्षीय ओमप्रकाश आणि 24 वर्षीय प्रीती यांना मृत घोषित केले. तर, त्यांची आई गिरिजा देवी आणि आणखी एक सदस्य यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

सीसीटीव्हीत स्फोटाचे दृश्य कैद

या दुर्घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला असून, त्यात स्फोटानंतर आगीच्या ज्वाळा आणि लोक जीव वाचवण्यासाठी पळताना दिसत आहेत. पोलिसांनी सांगितले की, घर आधीपासूनच अतिशय खराब अवस्थेत होते, त्यामुळे स्फोटाचा दाब सहन न झाल्याने ते पूर्णपणे कोसळले.

Web Title : वाराणसी: सिलेंडर विस्फोट में भाई-बहन की मौत, माँ घायल

Web Summary : उत्तर प्रदेश के वाराणसी में एक सिलेंडर विस्फोट से एक घर ढह गया। एक भाई और बहन की मौत हो गई, और उनकी माँ गंभीर रूप से घायल हो गई। गैस रिसाव और स्टोव जलाने से विस्फोट हुआ। बचे लोगों के लिए बचाव प्रयास जारी हैं।

Web Title : Varanasi Cylinder Blast: Siblings Dead, Mother Injured in Explosion

Web Summary : A massive cylinder blast in Varanasi, Uttar Pradesh, caused a house to collapse. A brother and sister died, and their mother was seriously injured. Gas leak and lighting the stove triggered the explosion. Rescue efforts are underway for survivors.