Video - भयंकर! व्हॅलेंटाईन डेवरून कपलमध्ये जोरदार भांडण; तरुणीची चौथ्या मजल्यावरून उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 12:43 IST2026-02-14T12:42:05+5:302026-02-14T12:43:08+5:30

दिल्लीतील विश्वास नगर भागात एका हॉटेलमध्ये घडलेल्या घटनेने सर्वांनाच हादरवलं आहे.

valentine week terrifying video shows young woman jumping from 4th floor of hotel room after quarrel in delhi | Video - भयंकर! व्हॅलेंटाईन डेवरून कपलमध्ये जोरदार भांडण; तरुणीची चौथ्या मजल्यावरून उडी

Video - भयंकर! व्हॅलेंटाईन डेवरून कपलमध्ये जोरदार भांडण; तरुणीची चौथ्या मजल्यावरून उडी

व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा आणि आनंदाचा दिवस मानला जातो, मात्र दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीतील विश्वास नगर भागात एका हॉटेलमध्ये घडलेल्या घटनेने सर्वांनाच हादरवलं आहे. किरकोळ वादाचं रूपांतर एका भीषण घटनेत कसं झालं, याचा अंदाज कोणालाच आला नसेल. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेच्या व्हिडिओने लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. रागाच्या भरात घेतलेला एक क्षणिक निर्णय किती महागात पडू शकतो याचं हे उदाहरण आहे.

गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास विश्वास नगरमधील 'हॉटेल संतोष रेसिडेन्सी'मध्ये ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक २० वर्षीय तरुणी तिच्या २२ वर्षीय प्रियकरासोबत या हॉटेलमध्ये थांबली होती. तिथेच त्यांच्यात व्हॅलेंटाईन डे वरून जोरदार भांडण झालं. हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात तरुणीने हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीतून थेट खाली उडी मारली. घटनेची माहिती मिळताच पोलीस नियंत्रण कक्षाला कळवण्यात आलं, त्यानंतर फर्श बाजार पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी दाखल झालं.

तरुणीची प्रकृती चिंताजनक

दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, तरुणीला गंभीर अवस्थेत तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून, तिच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्राथमिक तपासात हा प्रकार आपापसातील वादातून घडल्याचं दिसत असलं तरी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. हॉटेल कर्मचारी आणि तेथील प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत जेणेकरून घटनेचा नेमका क्रम स्पष्ट होईल.

या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला असून, पोलिसांनी तो तपासाचा भाग म्हणून ताब्यात घेतला आहे. या व्हिडिओमुळे लोकांमध्ये संताप आणि चिंता व्यक्त होत आहे. तपास पूर्ण झाल्यावरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये अफवा पसरवू नका आणि मानसिक तणावाच्या स्थितीत मदतीचा हात घ्या असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.

Web Title : वेलेंटाइन डे पर झगड़ा: महिला होटल से कूदी, हालत गंभीर।

Web Summary : दिल्ली: वेलेंटाइन डे पर झगड़े के बाद एक महिला होटल की चौथी मंजिल से कूद गई। वह गंभीर हालत में अस्पताल में भर्ती है, और पुलिस मामले की जांच कर रही है। शुरुआती खबरों में कहा गया है कि कूदने से पहले तीखी बहस हुई थी।

Web Title : Valentine's Day fight: Woman jumps from hotel, critical condition.

Web Summary : Delhi: A Valentine's Day argument led to a woman jumping from a hotel's fourth floor. She's hospitalized in critical condition, and police are investigating the incident. Initial reports suggest a heated dispute preceded the jump.