शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा हाहाकार! वैष्णो देवी यात्रा स्थगित, महामार्ग बंद, शाळांनाही सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 15:30 IST

Vaishno Devi Yatra Suspended: जम्मू-काश्मीरमध्ये निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे.हिमवृष्टी झाल्यामुळे आणि मुसळधार पावसामुळे माता वैष्णो देवीची यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली.

जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि जोरदार हिमवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्रिकुटा टेकड्यांवर झालेल्या हिमवृष्टीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव माता वैष्णो देवीची यात्रा स्थगित करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने अनेक जिल्ह्यांतील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले असून वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे.

माता वैष्णो देवी मंदिरात या हंगामातील पहिली हिमवृष्टी झाल्याने निसर्ग सौंदर्यात भर पडली असली तरी, भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. कटरा येथील बेस कॅम्पमधून भाविकांना पुढे जाण्यास बंदी घालण्यात आली असून, जे भाविक आधीच मार्गावर आहेत त्यांना सुरक्षित स्थळी थांबण्यास सांगण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत नवीन यात्रेकरूंना मंदिराकडे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.

 जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग (२७० किलोमीटर लांबी) हिमवृष्टीमुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. विशेषतः बनिहाल-काझीगुंड पट्ट्यातील नवयुग बोगद्याजवळ मोठ्या प्रमाणात बर्फ साचल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक थांबली आहे. याशिवाय मुघल रोड, श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग आणि सिंथन रस्ता देखील बर्फामुळे झाकला गेला आहे. हवामानाची प्रतिकूल परिस्थिती पाहता राजौरी, पूंछ आणि कठुआ या डोंगराळ जिल्ह्यांमधील सर्व शाळांना शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्यात आली. नागरिकांना मदतीसाठी पोलिसांनी प्रत्येक जिल्हा मुख्यालयात विशेष हेल्पलाइन क्रमांक सुरू केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रामबन, डोडा, किश्तवाड, पूंछ, राजौरी, रियासी, उधमपूर आणि कठुआ या परिसरात मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाली. अनेक भागांत ५ इंच ते १ फुटापेक्षा जास्त बर्फ साचला आहे. जम्मू शहरासह मैदानी भागात झालेल्या पावसामुळे दोन महिन्यांच्या दुष्काळाचा अंत झाला असून स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Snowfall Havoc in Jammu & Kashmir: Vaishno Devi Yatra Halted

Web Summary : Heavy snowfall and rain disrupt Jammu & Kashmir. Vaishno Devi Yatra suspended due to safety concerns. Schools closed, highways blocked. Relief in plains after rainfall ends drought.
टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरweatherहवामान अंदाज