रमजान महिन्यात मुस्लीम विद्यार्थ्यांसाठी शेळेच्या वेळापत्रकात बदल, गुजरातमधील आदेशावर VHP भडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 12:10 IST2025-03-03T12:08:49+5:302025-03-03T12:10:43+5:30

हा आदेश मागे घेण्यात आला नाही, तर अशाच पद्दतीची सवलत श्रावण आणि नवरात्रीमध्ये हिंदू विद्यार्थ्यांनाही देण्यात यावी, असेही विश्वहिंदू परिषदेने म्हटले आहे...

vadodara school board separate timing for muslim students in ramadan vhp protest | रमजान महिन्यात मुस्लीम विद्यार्थ्यांसाठी शेळेच्या वेळापत्रकात बदल, गुजरातमधील आदेशावर VHP भडकली

रमजान महिन्यात मुस्लीम विद्यार्थ्यांसाठी शेळेच्या वेळापत्रकात बदल, गुजरातमधील आदेशावर VHP भडकली

गुजरातमधील वडोदरा येथे रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या एका कथित आदेशावरून वाद निर्माण झाला आहे. वडोदरा प्रायमरी एज्युकेशन कमिटीने मुस्लीम मुलांसाठी रमजानमध्ये वेगळ्या वेळापत्रकाची घोषणा केल्याचे, विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे. विश्वहिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शन करून हा आदेश मागे घेण्याची मागणी केली आहे. तसेच, हा आदेश मागे घेण्यात आला नाही, तर अशाच पद्दतीची सवलत श्रावण आणि नवरात्रीमध्ये हिंदू विद्यार्थ्यांनाही देण्यात यावी, असेही विश्वहिंदू परिषदेने म्हटले आहे.

गुजरात विश्वहिंदू परिषदेचे प्रवक्ते हितेंद्र राजपूत यांनी फेसबूकवर म्हटले आहे की, "मुख्यमंत्री भूपेंद्र भाई यांचे सरकार यूसीसी (समान नागरिक संहिता) लागू करण्याची तयारी करत आहे, तर दुसरीकडे वडोदरा एजुकेशन कमिटी ने धर्मानुसार, तुष्टीकरणाला प्रोत्साहन देणारे सर्क्युलर जारी केले आहे."

यातच, विश्वहिंदू परिषदेने 'एक्स' वर म्हटले आहे, "कृपया या सर्क्युलरची सत्यता पडताळावी आणि ते तातडीने रद्द करावे. याला जबाबदार असलेल्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. हे लक्षात असू द्या की, तुष्टिकरणाला विरोध असल्यानेच भाजपला मोठे जनसमर्थन मिळाले आहे, हा गुजरात आहे. पाकिस्तान अतवा बांगलादेश नाही.

नगर प्राथमिक शिक्षण समितीच्या या सर्क्युलरमध्ये म्हणण्यात आले आहे की, "रमजानचा महिना सुरू होत आहे. ज्या शाळांमध्ये मुस्लीम समुदायाचे विद्यार्थी अधिक आहेत, त्यांच्यासाठ वेळेत बदल करण्यात येत आहे. हा बदल 1 मार्च 2025 पासून रमजान दरम्यान लागू केला जाईल.

सकाळची वेळ - 
शाळेची वेळ - 8AM ते 12 PM
जेवनाची सुट्टी - 9:30 AM ते 10 AM
दुपारची वेळ -  
शाळेची वेळ - 12:30 से 4:30 PM
ब्रेक - 2:00 से 2:30 AM

Web Title: vadodara school board separate timing for muslim students in ramadan vhp protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.