शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

लसीशी संबंधित मृत्यू ही आमची जबाबदारी नाही, कोविडबाबत केंद्राचे कोर्टात शपथपत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 8:31 AM

कोविडबाबत केंद्राचे कोर्टात शपथपत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोविड लसीकरणाच्या प्रतिकूल परिणामांसाठी सरकारला जबाबदार धरता येणार नाही, असे केंद्र सरकारनेसर्वोच्च न्यायालयात सांगितले. लसीमुळे मृत्यू झाल्याचे आढळल्यास दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून नुकसान भरपाई मिळवणे हाच एकमेव उपाय आहे, असे केंद्राने अलीकडेच न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. 

गेल्यावर्षी कोविड लसीकरणानंतर मरण पावलेल्या दोन तरुणींच्या पालकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्याच्या उत्तरादाखल केंद्राने हे शपथपत्र दाखल केले. या मृत्यूंची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात यावी. लसीकरणाच्या प्रतिकूल परिणामांचा (एईएफआय) लवकर छडा लावण्यासाठी तसेच त्यावर वेळेवर उपचार होतील यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय मंडळामार्फत एक प्रोटोकॉल तयार करावा, अशी मागणी याचिकेत केली होती. 

लसीकरणानंतर २,७८२ जणांची प्रकृती गंभीरn सरकारने सांगितले, की लोकांना दिलेल्या एकूण डोसच्या तुलनेत याचे प्रमाण खूपच कमी होते. n १९ नोव्हेंबर २०२२ पर्यंत देशात कोविड-१९ लसींचे २१९.८६ कोटी डोस दिले. त्यात केवळ ९२११४ एईएफआय नोंदवले गेले. n यापैकी ८९,३३२ किरकोळ स्वरूपाचे एईएफआय होते, तर केवळ २७८२ गंभीर होते. यात काहींचा मृत्यू ओढवला, असे म्हटले आहे.n तरुणींच्या मृत्यूंबद्दल शोक व्यक्त करताना केंद्राने म्हटले की, राष्ट्रीय एईएफआय समितीला यातील केवळ एका प्रकरणात मृत्यूचे कारण लसीशी संबंधित असल्याचे आढळले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारCorona vaccineकोरोनाची लस