काऊंटडाऊन सुरू... देशात कोरोना लसीकरणाची तारीख ठरली!

By मोरेश्वर येरम | Published: January 5, 2021 05:28 PM2021-01-05T17:28:09+5:302021-01-05T17:35:25+5:30

लसीकरण करणाऱ्या एका टीममध्ये ५ जणांचा समावेश असणार आहे.

vaccination starts in the country from January 13 or 14 Clear indications given by the Central Government | काऊंटडाऊन सुरू... देशात कोरोना लसीकरणाची तारीख ठरली!

काऊंटडाऊन सुरू... देशात कोरोना लसीकरणाची तारीख ठरली!

Next
ठळक मुद्देदेशात पुढील आठवड्यात लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यताकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली महत्वाची माहितीलसीकरणासाठी देशाची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचा केला दावा

नवी दिल्ली
कोरोनावरील लशीला आपत्कालीन मंजुरी मिळाल्याच्या १० दिवसांच्या आत देशात लसीकरणाला सुरुवात होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं. त्यामुळे येत्या आठवड्यात देशात लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. 

केंद्र सरकारने देशाला 'न्यू इयर गिफ्ट' देत भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या कोवीशिल्ड लशीला ३ जानेवारी रोजी आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. या मंजुरीपासून १० दिवसांच्या आत म्हणजेच देशात १३ किंवा १४ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 

लसीकरण करणाऱ्या एका टीममध्ये ५ जणांचा समावेश असणार आहे. कोरोना लशीच्या साठ्याबाबत माहिती देताना राजेश भूषण यांनी देशात कर्नाल, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे प्राथमिक लस स्टोअर बनविण्यात आले आहेत. देशात असे एकूण ३७ लस साठवणुकीचे स्टोअर सज्ज आहेत. या ठिकाणांवर लस साठवली आणि तिथूनच इतर ठिकाणी वितरीत केली जाईल, असंही भूषण यांनी सांगितलं. देशात लशीच्या वाटपावर डिजिटल पद्धतीनं नियंत्रण ठेवलं जाणार आहे. गेल्या १० वर्षांपासूनच ही सुविधा भारतात उपलब्ध असल्याचं त्यांनी आवर्जुन सांगितलं. 

रुग्ण संख्येत घट
देशात कोरोनाला अटकाव घालण्यात यश येत असल्याचंही राजेश भूषण यांनी सांगितलं. गेल्या ११ दिवसांत दर दिवसाला ३०० हून कमी मृत्यू होत आहेत. देशात कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट केवळ १.९७ टक्के इतका असून एकूण पॉझिटीव्ह रुग्णांपैकी ४३.९६ टक्के रुग्णांवर रुग्णालय अथवा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तर ५६.०४ टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. 
 

Read in English

Web Title: vaccination starts in the country from January 13 or 14 Clear indications given by the Central Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.