Corona Vaccination: लसीकरण झालेले कोरोना रुग्ण उपचारांना उत्तम प्रतिसाद देतात, नवा अहवाल समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 08:19 PM2021-05-07T20:19:41+5:302021-05-07T20:22:12+5:30

Corona Vaccination: कोरोना विरोधी लस घेतल्यानंतरही कोरोना होत असल्यानं लसींच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असले तरी लसीकरण किती महत्वाचं आहे हे सांगणारा एक अहवाल नुकताच समोर आला आहे.

Vaccinated patients respond better to Covid 19 treatment claims study | Corona Vaccination: लसीकरण झालेले कोरोना रुग्ण उपचारांना उत्तम प्रतिसाद देतात, नवा अहवाल समोर

Corona Vaccination: लसीकरण झालेले कोरोना रुग्ण उपचारांना उत्तम प्रतिसाद देतात, नवा अहवाल समोर

Next

Corona Vaccination: कोरोना विरोधी लस घेतल्यानंतरही कोरोना होत असल्यानं लसींच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असले तरी लसीकरण किती महत्वाचं आहे हे सांगणारा एक अहवाल नुकताच समोर आला आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होणारे रुग्ण उपचारांना उत्तम प्रतिसाद देतात आणि रुग्णालयात दाखल होण्यापासून त्यांना वाचवता येतं, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. (Vaccinated patients respond better to Covid-19 treatment claims study)

कोरोनाचं भीषण वास्तव, यमुना नदीत आढळली वाहती प्रेतं,  उत्तर प्रदेशातील गावांमध्ये भयानक परिस्थिती!

देशातील एकूण १ लाख कोरोना रुग्णांचा अभ्यास करण्यात आला आहे. यातून समोर आलेली अंतिम माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण कोरोनाची लागण झालेल्यांपैकी ६,५०० जण असे आहेत की ज्यांनी कोरोना विरोधी लसीचा पहिला डोस घेतला आहे. 

मुंबईतील भेंडीबाजारात दाऊदी बोहरा समुदायानं उभारला 'कोविड वॉररुम', रुग्णांना केली जातेय 'स्मार्ट' मदत

उत्तर प्रदेशातील सरकारनं केलेल्या अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार कोरोनाची लस घेऊनही कोरोनाची लागण झालेल्यांपैकी ९५ टक्के रुग्णांना शून्य टक्के ते सौम्य लक्षणं आढळून आली आहेत. तर ३.५ टक्के रुग्णांना पहिल्या टप्प्यातील हेल्थ केअर सेवेची गरज लागली. यात अनेकांना घरी आयसोलेट होण्याची व्यवस्था नसल्यानं क्वारंटाइन सेंटरमध्ये यावं लागलं, अशी सुत्रांनी माहिती दिली.  

कोरोना रुग्णांना सेवा देताना डॉक्टर्स सर्वात मोठ्या धोक्याचा सामना करत असतात. त्यामुळे त्यांच्या जीवाला सर्वाधिक धोका असतो. कोरोना लसीमुळे डॉक्टरांना एक बुस्टर मिळाला आहे. लस घेऊनही कोरोना होत असला तरी त्याचं इन्फेक्शनचं प्रमाण अगदीच नगण्य आहे. अगदी सात दिवसांतही रुग्ण बरा होतो. विषाणूची मोठ्या प्रमाणात लागण होत नाही. त्यामुळे लसीबाबतच्या सर्व भ्रामक गोष्टींना बाजूला ठेवून नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावं, अशी माहिती प्राध्यापक आर.के.धिमान यांनी दिली. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Vaccinated patients respond better to Covid 19 treatment claims study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app