शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

व्ही. के. सिंह यांच्या पत्नीला धमकी

By admin | Updated: August 18, 2016 05:48 IST

एक आॅडिओ - व्हिडिओ रेकॉर्डिंग सार्वजनिक करण्याची धमकी देत एक व्यक्ती आपल्याला दोन कोटी रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. के. सिंह

नवी दिल्ली : एक आॅडिओ - व्हिडिओ रेकॉर्डिंग सार्वजनिक करण्याची धमकी देत एक व्यक्ती आपल्याला दोन कोटी रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. के. सिंह यांच्या पत्नी भारती सिंह यांनी केली आहे. या प्रकरणी प्रदीप चौहान या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि, या व्यक्तीला अद्याप अटक करण्यात आली नाही. भारती सिंह यांनी केलेल्या आरोपात म्हटले आहे की, छेडछाड करण्यात आलेल्या एका आॅडिओ - व्हिडिओ क्लिपच्या आधारावर आपल्या पतीला बदनाम करण्याची धमकी हा व्यक्ती देत आहे. प्रदीप चौहान नावाचा हा व्यक्ती दोन कोटी रुपयांची मागणी करत असून जर पैसे दिले नाही तर याचे गंभीर परिणाम होतील, असेही तो सांगत आहे. या व्यक्तीने यूट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यात त्यांचे पती आणि कुटुंबाविरुद्ध खोटे आरोप केले होते. या प्रकरणी तुगलक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौहान हा गुडगावचा रहिवासी आहे. या प्रकरणी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, या प्रकरणी आम्ही तपास करत आहोत. आरोपीची चौकशीही केली. या आरोपीला पुन्हा बोलाविण्यात येणार आहे. या आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही. बळजबरीने वसुली करणे आणि धमकी दिल्याप्रकरणी या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)कोण आहे आरोपी? भारती सिंह यांनी सांगितले की, हा आरोपी आपल्या पुतण्याचा मित्र आहे. गत काही दिवसांपासून तो आपल्याला फोन करत आहे आणि हे आॅडिओ आणि व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी तो देत आहे. तथापि, या क्लिपमध्ये नेमके काय आहे? याबाबत आपल्याला माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले. ६ आॅगस्ट रोजी रात्री तर या आरोपीने वारंवार फोन करुन तुमच्या पतीची प्रतिष्ठा धुळीस मिळविण्याची धमकी दिली.