व्ही. के. शशिकला यांचे पती एम. नटराजन यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 06:24 IST2018-03-20T05:34:11+5:302018-03-20T06:24:55+5:30

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेल्या आणि अण्णाद्रमुकमधून बडतर्फ करण्यात आलेल्या व्ही. के. शशिकला यांचे पती एम. नटराजन यांचं निधन झाले. ते  76 वर्षांचे होते. 

V. K. Shashikala's husband M Natarajan passed away | व्ही. के. शशिकला यांचे पती एम. नटराजन यांचं निधन

व्ही. के. शशिकला यांचे पती एम. नटराजन यांचं निधन

चेन्नई : बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेल्या आणि अण्णाद्रमुकमधून बडतर्फ करण्यात आलेल्या व्ही. के. शशिकला यांचे पती एम. नटराजन यांचं मंगळवारी रात्री निधन झाले. ते  76 वर्षांचे होते.

एम. नटराजन यांच्यावर चेन्नईतील ग्लेनीगल्स ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. गेल्या रविवारी त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. एम. नटराजन यांची प्रकृती खालवल्याने त्यांना सोमवारी दुपारी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती उपचारांना साथ देऊ न शकल्याने अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

ग्लेनीगल्स ग्लोबल हॉस्पिटलने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, अनेक अवयव निकामी झाल्याने एम. नटराजन यांचे निधन झाले. तसेच, गेल्या वर्षी त्यांच्यावर किडनी आणि यकृत प्रत्यारोपण करण्यात आले होते. 


दरम्यान, बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी व्ही. के. शशिकला यांना न्यायालयाने चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून सध्या त्या बंगळुरुमधील तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. 

Web Title: V. K. Shashikala's husband M Natarajan passed away