श्वास गुदमरतोय! ऑक्सिजनचा पुरवठा करा, उत्तरकाशीतील बोगद्यात अडकून असलेल्या कामगारांचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 04:13 PM2023-11-14T16:13:48+5:302023-11-14T16:14:31+5:30

Uttarkashi Tunnel Resque Update: उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळून ४० कामगार बोगद्यामध्ये अडकून पडले आहे. जवळपास अडीच दिवस होत आले तरी या कामगारांची या बोगद्यामधून सुटका होऊ शकलेली नाही.

Uttarkashi Tunnel Resque Update: Suffocating! Supply oxygen, the message of the workers trapped in the tunnel in Uttarkashi | श्वास गुदमरतोय! ऑक्सिजनचा पुरवठा करा, उत्तरकाशीतील बोगद्यात अडकून असलेल्या कामगारांचा संदेश

श्वास गुदमरतोय! ऑक्सिजनचा पुरवठा करा, उत्तरकाशीतील बोगद्यात अडकून असलेल्या कामगारांचा संदेश

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळून ४० कामगार बोगद्यामध्ये अडकून पडले आहे. जवळपास अडीच दिवस होत आले तरी या कामगारांची या बोगद्यामधून सुटका होऊ शकलेली नाही. बोगद्यात अकडून पडलेल्या कामगारांशी संपर्क होत असून, सर्वजण आतापर्यंत सुरक्षित आहेत. या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच या बचाव मोहिमेमध्ये आजचा दिवस खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याचं कारण म्हणजे आज बचाव मोहिमेत मोठा बदल करण्यात आला असून, आता बोगद्यात जमलेला मातीचा ढीग बाहेर काढला जाणार नाही तर ड्रिलींग करून कामगारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान, बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी प्रशासनाकडून सातत्याने संपर्क साधला जात आहे. दरम्यान, बचाव पथकाने वॉकी टॉकीच्या माध्यमातून जेव्हा या मजुरांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी केली. आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत. तसेच खाण्यापिण्याचं साहित्य आमच्यापर्यंत पोहोचत आहे. मात्र ऑक्सिजनची आवश्यकता असून, ऑक्सिजनचा पुरवठा सातत्याने सुरू ठेवा, अशी मागणी या कामगारांनी केली आहे.

आज बचाव मोहिमेदरम्यान बोगद्यामधून माती बाहेर काढली जात नाही आहे. बोगद्यात आतमध्ये २०० मीटर अंतरावर नवी मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या एजन्सींचे तज्ज्ञ दाखल झाले आहेत. नव्या मोहिमेमुळे कामगारांची सुटका करण्यामध्ये आठ ते १० तासांमध्ये मोठं यश मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. आता बोगद्यामधील दगडमाती काढण्याऐवजी ड्रील करून मजुरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी मोठमोठ्या ट्रकमधून पाईप मागवण्यात आले आहेत. पाईपच्या माध्यमातून मजुरांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याबरोबरच बोगद्यात अडकलेल्या कामगारांचे नातेवाईकही घटनास्थळी पोहोचले आहेत.

बोगद्यात अडकलेल्या ४० कामगारांना वाचवण्यासाठीच्या प्रयत्नांना अधिक गती देण्यात आली आहे. बोगद्याचं बांधकाम करत असलेल्य कंपनीनं सांगितलं की, बोगद्यामध्ये शॉटक्रेटिंगच्या माध्यमातून माती हटवली जात आहे. तसेच हायड्रॉलिक जॅकच्या मदतीने ९०० मिमी व्यासाचे स्टील पाईप आतमध्ये सोडले जात आहेत. त्यामधून आत अडकलेल्या कामगारांना बाहेर काडण्यात येणार आहे. लवकरच बचाव कार्य पूर्ण होणार असून, सर्व कामगारांना सुरक्षितरीत्या बाहेर काढलं जाईल, से आपत्ती व्यवस्थापनाचे सचिव रंजीत कुमार सिन्हा यांनी सांगितले.  

Web Title: Uttarkashi Tunnel Resque Update: Suffocating! Supply oxygen, the message of the workers trapped in the tunnel in Uttarkashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.