भाजपला मोठा धक्का, उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री यशपाल आर्य यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 12:27 PM2021-10-11T12:27:40+5:302021-10-11T12:28:29+5:30

Yashpal Arya joins congress: पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी उत्तराखंडमध्ये पक्षांतर सुरू झालं आहे.

Uttarakhand news in marathi, Uttarakhand Cabinet Minister Yashpal Arya joins Congress | भाजपला मोठा धक्का, उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री यशपाल आर्य यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपला मोठा धक्का, उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री यशपाल आर्य यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Next

डेहराडून: उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. येत्या काही महिन्यात उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण, त्यापूर्वीच भाजप सरकारमधील परिवहन व समाज कल्याण अल्पसंख्याक मंत्री यशपाल आर्य काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. राज्याच्या राजकारणात दलितांचा मोठा चेहरा समजल्या जाणाऱ्या कॅबिनेट मंत्री यशपाल आर्य यांच्यासोबत त्यांचे पुत्र आमदार संजीव आर्य यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी नेत्यांच्या बदलीचा खेळ पुन्हा सुरू झाला आहे. भाजप नेते यशपाल आर्य यांची पाच वर्षानंतर घरवापसी झाली आहे. यशपाल आर्य हे त्या 9 काँग्रेस आमदारांपैकी एक होते, ज्यांनी 2016 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये येताच यशपाल आर्य यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं तर त्यांचा मुलगा संजीव आर्य यांनाही आमदार करण्यात आलं. निवडणुकीपूर्वीच यशपाल काँग्रेसमध्ये परतल्यामुळे भाजपला मोठा धक्का मानला जातोय.

कोण आहेत यशपाल आर्य  ?
69 वर्षीय यशपाल आर्य उत्तराखंडच्या राजकारणातील सर्वात मोठा दलित चेहरा आहेत. 1989 मध्ये यशपाल आर्य पहिल्यांदा उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडुन गेले. उत्तराखंडच्या स्थापनेनंतर 2002 च्या निवडणुकीत ते उत्तराखंड विधानसभेचे सदस्य झाले. तेव्हापासून यशपाल आर्य प्रत्येक निवडणुकीत जिंकत आले आहेत. यशपाल आर्य हे बाजपूरचे आमदार आहेत तर त्यांचा मुलगा संजीव आर्य नैनीताल मतदारसंघातून आमदार आहेत. 
 

Web Title: Uttarakhand news in marathi, Uttarakhand Cabinet Minister Yashpal Arya joins Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.