Kumbh Mela 2021: कुंभमेळ्यात लाखोंची गर्दी, कोरोना नियमांच्या चिंधड्या; अनेक साधू कोरोना पॉझिटिव्ह!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 01:23 PM2021-04-12T13:23:52+5:302021-04-12T13:28:04+5:30

मोठी गर्दी असल्याने अनेक ठिकाणी कोरोना नियमांचेही उल्लंघण होतानाही दिसून आले. येथे ना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत आहे, ना कुणी मास्क लावताना दिसत आहे. (kumbh 2021 second shahi snan)

Uttarakhand Haridwar kumbh 2021 second shahi snan somvati amavasya | Kumbh Mela 2021: कुंभमेळ्यात लाखोंची गर्दी, कोरोना नियमांच्या चिंधड्या; अनेक साधू कोरोना पॉझिटिव्ह!

Kumbh Mela 2021: कुंभमेळ्यात लाखोंची गर्दी, कोरोना नियमांच्या चिंधड्या; अनेक साधू कोरोना पॉझिटिव्ह!

googlenewsNext

नवी दिल्ली - हरिद्वार येथे आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यात (kumbh 2021) आज दुसरे शाही स्नान होत आहे. या शाही स्नानासाठी अनेक अखाड्यांतील साधू-संत आले आहेत. यावेळी कोरोना नियमांच्या पार चिंधड्या उडाल्याचे पाहायला मिळाले. अनेक साधूही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. असे असतानाही उतराखंड (Uttarakhand) पोलीस कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्यात अक्षम दिसत आहे. (Uttarakhand Haridwar kumbh 2021 second shahi snan somvati amavasya)

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

दीपक रावत यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले, की सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. 50 हजार लोकांची टेस्ट करण्यात येत आहे. अनेक साधू पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आणखीही टेस्ट करण्यात येत आहे. हे सर्व आव्हानात्मक आहे. मात्र, लोकांनी नियमांचे पाल करावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. 

ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंगचं पालन -
मोठी गर्दी असल्याने अनेक ठिकाणी कोरोना नियमांचेही उल्लंघण होतानाही दिसून आले. येथे ना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत आहे, ना कुणी मास्क लावताना दिसत आहे. कुंभ मेळ्याचे आयजी संजय गुंज्याल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाही स्नानासाठी सर्वात पहिले अखाड्यांना परवानगी देण्यात आली. यानंतर 7 वाजल्यापासून सामान्य जनतेला स्नानाची परवानगी देण्यात आली. 

कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही घातक; माणूस राहिला तरच आस्था टिकेल; रमजानवर योगी म्हणाले...

संजय गुंज्याल म्हणाले - आज नियमांचे पालन करणे कठीण -
कुंभमेळा आयजी संजय गुंज्याल यांनी म्हटले आहे, की आम्ही लोकांना सातत्याने कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहोत. मात्र, आज मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने चालान देणे व्यवहारिक दृष्ट्या अश्यक्य आहे. घाटांवर कोरोना नियमांची अंमलबजावणी करणे अत्यंत कठीण आहे. आम्ही सोशल डिस्टंसिंगची अंमलबजावणी करायला सुरुवात केली, तर धावपळही उडू शकते.

शाही स्नानापूर्वीच 1333 पॉझिटिव्ह -
शाही स्नानाच्या एक दिवस आधीच उत्तराखंडमधून कोरोना रुग्णांचे भीतीदायक आकडे समोर येऊ लागले आहेत. गेल्या 24 तासांत 1,333 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर देहरादूनमध्ये 582, हरिद्वारमध्ये 386, नैनीताल येथे 122 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर हर की पौडी येथे रविवारी 9 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

चिनी अधिकाऱ्यानंच केली त्यांच्या कोरोना लशीची 'पोल-खोल'; जिनपिंग सरकारनं उचललं असं पाऊल

Web Title: Uttarakhand Haridwar kumbh 2021 second shahi snan somvati amavasya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.