शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

माझ्या लेकाचं किमान एक बोट तरी आणून द्या रेss; उत्तराखंडमधील हतबल बापाची आर्त किंकाळी

By मोरेश्वर येरम | Published: February 12, 2021 3:09 PM

Uttarakhand Disaster : जसजसा एक एक दिवस उलटतोय तसं टनेलमध्ये अडकलेल्यांना जीवंत बाहेर काढण्यासाठीच्या आशाही कमी होत जात आहेत.

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत अडकेल्यांना बाहेर काढण्यासाठीच्या बचाव कार्याचा आज सहावा दिवस आहे. तपोवन टनलमध्ये अडकलेल्यांना वाचविण्यासाठी अनेक एजन्सी दिवसरात्र एक करुन काम करत आहेत. पण जसजसा एक एक दिवस उलटतोय तसं टनेलमध्ये अडकलेल्यांना जीवंत बाहेर काढण्यासाठीच्या आशाही कमी होत जात आहेत. (Uttarakhand Disaster Rescue Operation)

वाचण्याची आशाच सोडली; पण तितक्यात मोबाईल नेटवर्क काम करू लागलं अन्...

अनेक कुटुंबांनी तर आता टनेलमध्ये अडकलेल्या आपल्या कुटुंबातील सदस्य जीवंत असतील याच्या आशाही सोडून देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता कुटुंबियांनी आम्हाला आमच्या कुटुंबातील सदस्यांचे किमान मृतदेह तरी मिळवून द्या अशी आर्त हाक दिली आहे. 

उत्तराखंड दुर्घटना हिमकडा कोसळून नाही, त्रिशूळ पर्वतामुळे; सॅटेलाईट फोटो आले

तपोवन टनेलमध्ये साचलेलं पुराचं पाणी आता कमी होऊ लागलं आहे. तर चिखल आणि साचलेला गाळ देखील कमी होतोय. टनेलमध्ये आणखी ३७ जण अडकल्याची शक्यता असून त्यांना बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती बचावकार्य करणाऱ्या एजन्सीच्या सदस्यांनी सांगितलं आहे. आतापर्यंत एकूण ३६ लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर एजूनही अनेक जण बेपत्ता आहेत. 

कुटुंबियांच्या आशा मावळल्या"मला माझ्या मुलाचं किमान एक बोट तरी आणून द्या. मला गावी जाऊन त्यावर अंत्यसंस्कार करायचे आहेत", असं एका मुलाचा बाप रडरडत म्हणाला. तपोवन टनेलमध्ये विजय सिंह हा वेल्डरचं काम करत होता. या दुर्घटनेत तो टनेलमध्येच अडकून पडला आहे. अद्याप त्याचा कोणताही ठावठिकाणा लागू शकलेला नाही. विजय सिंह याचे वडील टनेलच्या बाहेरच आपला मुलगा सुखरुप बाहेर येईल याची वाट पाहात बसले आहेत. पण आता सहा दिवसांनंतरही त्यांच्या मुलाचा काही पत्ता न लागल्यानं त्यांनी आर्त किंकाळी देत किमान आपल्या मुलाचं बोट तरी आणून द्या असं हतबलतेनं म्हटलं आहे. विजय सिंह याच्यासारखेच दोन डझनहून अधिक जण टनेलमध्ये चिखलाच्या खाली गाडले गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, टनेलमध्ये अडकलेल्यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाकडून शर्थीचे प्रयत्न सुरूच आहेत.  

टॅग्स :uttarakhand glacier burstउत्तराखंड हिमकडाfloodपूर