शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

Uttarakhand Assembly Election: गटबाजीमध्ये अडकले उत्तराखंडचे राजकारण; काँग्रेस, भाजपत गटबाजीला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 6:21 AM

सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते खेचताहेत स्वपक्षीयांचे पाय

- शरद गुप्तानवी दिल्ली : भाजपने जाहीर केलेल्या उत्तराखंडच्या ५९ उमेदवारांच्या यादीतून रितू खंडूरी यांचे नाव वगळण्यात आले. त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री मेजर जनरल (सेवानिवृत्त) भुवनचंद्र खंडूरी यांच्या कन्या आहेत व पौडी गढवालच्या यमकेश्वर मतदारसंघातून विद्यमान आमदारही आहेत. भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा हा परिणाम समजला जात आहे.आणखी एक माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक ज्यांना नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळातून हटविण्यात आले, त्यांचेही राज्याच्या राजकारणावर बारीक लक्ष असते. अन्य एक माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. परंतु उत्तराखंडच्या राजकारणात जास्त रस दाखवतात. त्यांच्याबरोबरच केंद्रीय राज्यमंत्री अजय भट्ट आणि राज्यसभा सदस्य व भाजपचे राष्ट्रीय प्रभारी अनिल बलूनी यांचीही राजकारणात चलती आहे. काँग्रेसमध्येही फूटदुसरीकडे काँग्रेसमध्येही एकजूट नाही. माजी मुख्यमंत्री व मुख्यमंत्री पदाचे घोषित उमेदवार हरीश रावत यांचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल व विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रीतम सिंह यांच्याशी फारसे पटत नाही. मगरींमध्ये अडकलोतिघांच्या हस्तक्षेपाने संतप्त झालेले हरीश रावत यांनी मागील महिन्यात निवडणूक लढण्यास नकार दिला होता. पक्ष सोडण्याचे संकेतही त्यांनी दिले होते. ट्विटरवर त्यांनी म्हटले होते की, ज्या संघटनेला मला प्रत्येक बाबीमध्ये साथ द्यायला पाहिजे, ते प्रत्येक बाबतीत विरोध करीत आहेत. माझ्या भोवती मगरींना सोडले आहे. ज्यांच्या आदेशावर पोहायचे आहे, त्यांचे समर्थक हातपाय बांधत आहेत. आता विचार येतोय की, फार पोहून झाले. आता विश्रांती करण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Uttarakhand Assembly Election 2022उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेसBJPभाजपा