उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातून एक चकीत करणारे प्रकरण समोर आले आहे. येथील जिल्हा तुरुंगात कैद असलेल्या 103 वर्षीय कैद्याची सन्मानाने निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. विशेष म्हणजे, या कैद्याने आपल्या आयुष्यातील 43 वर्षे या तुरुंगात घालवली. आता इतक्या वर्षांनंतर त्या कैद्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आता तुम्हालाही प्रस्न पडला असेल, या कैद्याने काय गुन्हा केला होता..?
मिळालेल्या माहितीनुसार, लखन नावाचेय 103 वर्षीय व्यक्ती कौशांबी पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी आहेत. 1977 साली खून आणि हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली लखन यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले होते. त्यांनी 1982 पर्यंत कायदेशीर लढाई लढली, परंतु न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 1982 मध्येच त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यांच्या अपीलवरील खटला 43 वर्षे चालला आणि निकाल त्यांच्या बाजूने लागला.
2 मे 2025 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांना सन्मानपूर्वक निर्दोष मुक्त केले आणि तुरुंगातून तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले. असे असूनही, तांत्रिक बिघाडाचे कारण देत अलाहाबाद न्यायालयाने त्यांच्या सुटकेचा आदेश दिला नव्हता. उच्च न्यायालयाचा निर्णय आणि आदेश असूनही, अलाहाबाद न्यायालयाच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मंलखन यांना तुरुंगातून सोडण्यात येत नव्हते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव पूर्णिमा प्रांजल यांच्या सूचनेनुसार, कायदेशीर सल्लागार अंकित मौर्य यांनी त्यांच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयात अपील केले. तसेच, ट्विटद्वारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, कायदा मंत्री, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाकडे तक्रार केली. त्यानंतर उच्च न्यायालयाने लखन यांना तात्काळ सोडण्याचे आदेश दिले.