शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

‘काहीतरी गडबड केलीय, त्यामुळेच ४०० जागा मिळणार हे भाजपाला कळलंय’, प्रियंका गांधींनी उपस्थित केली शंका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 2:44 PM

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: भाजपा आणि मोदी यांच्याकडून करण्यात येत असलेल्या ४०० पार जागा जिंकण्याच्या दाव्यावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्याकडून शंका उपस्थित करण्यात आली आहे. भाजपाने आधीच काही तरी गडबड करून ठेवली आहे. त्यामुळे त्यांना ४०० जागा जिंकणार हे कळलंय, असा दावा प्रियंका गांधी यांनी केला आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाकडून ‘अबकी बार ४०० पार’अशी घोषणा देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ठिकठिकाणी प्रचार करताना ४००पार जागा जिंकून देण्याचं आवाहन मतदारांना करत आहेत. दरम्यान, भाजपा आणि मोदी यांच्याकडून करण्यात येत असलेल्या ४०० पार जागा जिंकण्याच्या दाव्यावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्याकडून शंका उपस्थित करण्यात आली आहे. भाजपाने आधीच काही तरी गडबड करून ठेवली आहे. त्यामुळे त्यांना ४०० जागा जिंकणार हे कळलंय, असा दावा प्रियंका गांधी यांनी केला आहे.

प्रियंका गांधी ह्या आज उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे रोड शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. तिथे त्या म्हणाल्या की, यांनी आधीच काहीतरी गडबड करून ठेवलेली आहे. तेव्हाच ४०० पार जागा जिंकणार हे कळलं आहे. जर देशामध्ये अशा निवडणुका झाल्या ज्यात ईव्हीएममध्ये कुठलीही गडबड झाली नाही तर मी ठामपणे सांगू शकते की, भाजपाला १८० पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. कदाचित त्यापेक्षा कमीच जागा त्यांना मिळतील, असा दावा प्रियंका गांधी यांनी केला.

सहारनपूरमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांनी आज सहारनपूरमध्ये रोड शो केला. यावेळी त्या म्हणाल्या की, त्यांचे नेते प्रत्येक ठिकाणी सांगताहेत की, घटना बदलली जाणार आहे. जर घटना बदलली गेली तर आरक्षणाचं काय होणार? सर्वांच्या मताधिकाराचं काय होणार. याचं उत्तर दिलं पाहिजे. घाबरू नका, म्हणणं पुरेसं नाही. आम्ही तसेही तुम्हाला घाबरत नाही, असा टोलाही प्रियंका गांधी यांनी लगावला.  

टॅग्स :Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४