शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयात महिलेवर गँगरेप, कवडीमोल दराने घेतली जमीन, भाजपा आमदारावर गंभीर आरोप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 23:35 IST

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील बदायूँ येथील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये बिल्सी येथील भाजपा आमदार हरीश शाक्य, त्यांचा भाऊ आणि पुतण्यासह एकूण १६ जणांविरोधात सामुहिक बलात्कार आणि फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सत्ता असलेल्या भाजपाच्या आणखी एका आमदारावर गंभीर आरोप झाले आहेत. उत्तर प्रदेशमधील बदायूँ येथील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये बिल्सी येथील भाजपाआमदार हरीश शाक्य, त्यांचा भाऊ आणि पुतण्यासह एकूण १६ जणांविरोधात सामुहिक बलात्कार आणि फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमपी/एमएलए सस्पेशन कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपांमध्ये सामुहिक बलात्कार, कोट्यवधीची फसवणूक आणि तक्रारकर्त्याला खोट्या गुन्ह्यांमध्ये फसवणे यांचा समावेश आहे. 

एमपी/एमएलए कोर्टाचे अतिरिक्त मुख्य न्यायालयीन दंडाधिकारी लीलू चौधरी यांनी ११ डिसेंबर रोजी एका ग्रामस्थाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर हे आदेश दिले आहेत. भाजपा आमदार हरीश शाक्य यांच्या नेतृत्वाखालील टोळी आपल्याला आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांवर दबाव आणून आणि धमक्या देऊन जबरदस्तीने वसुली करत असल्याचा आरोप या तक्रारीमधून करण्यात आला होता. 

सदर ग्रामस्थाच्या मालकीच्या जमिनीच्या तुकड्यावरून हा वाद सुरू आहे. भाजपा आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तक्रारकर्ता आणि त्याच्या कुटुंबावर कमी किमतीत जमीन विकण्यासाठी दबाव आणला. जेव्हा याला विरोध करण्यात आला, तेव्हा त्यांच्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात हत्या आणि बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यांमध्ये फसवणे आणि धमक्या देण्याचा समावेश आहे. 

आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कुटुंबाच्या जमिनीच्या काही भागावर अवैधरीत्या कब्जा केला. तसेच १७ सप्टेंबर रोजी ऑफिसमध्ये आपल्या पत्नीवर सामुहिक बलात्कार केला होता, असा आरोपही तक्रारदाराने केला. वरिष्ठ पोलीस अधीक्षक बृजेश कुमार सिंह यांनी कोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीBJPभाजपाMLAआमदार