"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 23:14 IST2025-12-08T23:13:26+5:302025-12-08T23:14:37+5:30
देशाच्या फाळणीनंतर, भारतात जे मुस्लीम थांबले, त्यांपैकी 80 टक्के मुस्लिमांचे पूर्वज हिंदू होते आणि त्यांच्या मनात आजही 'वंदे मातरम'साठी आदर आहे. काँग्रेसला प्रत्येक विषयाला विरोध करण्याचा अधिकर कुणीही दिलेला नाही. असेही ते म्हणाले.

"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा
उत्तर प्रदेसातील कैसरगंजचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी सोमवारी एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यासंदर्भात मोठे विधान केले आहे. “ओवेसी यांचे पूर्वज हिंदू होते आणि त्यांचा जन्म ब्राह्मण कुलात झाला होता,” असा दावा बृजभूषण सिंह यांनी केला आहे. ते येथे एका खाजगी कार्यक्रमासाठी आले असता माध्यमांशी बोलत होते. त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वंदे मातरमला विरोध करण्यावरून, बृजभूषण सिंह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, "काँग्रेस जाणूनबुजून अशाच मुद्द्यांवरून देशाचे लक्ष भरकटवते. अशाच मुद्द्यांमुळे काँग्रेसची वाईट अवस्ता झाली आहे. स्वातंत्र्यलढ्यात वंदे मातरमने प्रेरणा दिली. त्यात मोठ्या संख्येने मुस्लीम स्वातंत्र्यसेनानीही सहभागी होते. वंदेमातरमला कुणाचाही विरोध नव्हता. मात्र पुढे चालून जिन्नांनी वंदे मातरमला विरोध केला. नंतर, इंग्रजांनी भारत आणि पाकिस्तान असे धर्माच्या आधारावर विभाजन केले.
देशाच्या फाळणीनंतर, भारतात जे मुस्लीम थांबले, त्यांपैकी 80 टक्के मुस्लिमांचे पूर्वज हिंदू होते आणि त्यांच्या मनात आजही 'वंदे मातरम'साठी आदर आहे. काँग्रेसला प्रत्येक विषयाला विरोध करण्याचा अधिकर कुणीही दिलेला नाही. असेही ते म्हणाले.
कल्किधामसंदर्भात बोलताना बृजभूषण सिंह म्हणाले, आपण स्वतः कल्किधामला भेट देऊन आलो आहोत. कल्किधाम अत्यंत सुंदर होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचा शिलान्यास केला असून आचार्य प्रमोद कृष्णम तेथील कामकाज बघत आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले, ज्यांना मानायचे आहे त्यांनी मानावे, ज्यांना नाही मानायचे त्यांनी माणू नये, शास्त्रांनुसार कलियुगाच्या शेवटी कल्किअवतार होणार आहे.