शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलच! भाजपा खासदाराने मच्छर चावल्याने थांबवली ट्रेन; रेल्वे प्रशासनाला धरलं धारेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 18:35 IST

उत्तर प्रदेशातून एक अनोखी घटना समोर आली आहे.

MP stopped the train in UP । लखनौ : उत्तर प्रदेशातून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे मच्छर चावल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या (BJP) खासदाराने चक्क ट्रेन थाबंवली असून याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. खरं तर एटाचे खासदार राजवीर सिंह लखनौच्या चारबाग रेल्वे स्थानकावरून दिल्लीला निघालेल्या गोमती एक्स्प्रेस (१२४१९) ट्रेनमधून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांना मच्छर चावली. मग खासदार महोदयांनी जे केले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.

दरम्यान, खासदार सिंह यांनी ट्रेन थांबवत रेल्वे प्रशानसाला स्वच्छतेच्या कारणास्तव धारेवर धरले. सिंह यांचा राग पाहून घाईगडबडीत रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि गाडी थांबवल्यानंतर संपूर्ण बोगीमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. बोगीची साफसफाई झाल्यानंतरच गाडी तिथून रवाना करण्यात आली. लक्षणीय बाब म्हणजे राजवीर सिंह हे ट्रेनच्या पहिल्या एसी डब्यात प्रवास करत होते. पण रेल्वेचे शौचालय अस्वच्छ असून डास चावत आहेत. त्यामुळे इथे बसणे देखील कठीण झाले असल्याचे सिंह यांनी सांगितले.  रेल्वेच्या कारभाराची सोशल मीडियावर चर्चा रेल्वेच्या या निर्णयाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. सामान्य माणसाला प्रवासादरम्यान अशा समस्यांशी सतत झगडावे लागते, असे नेटकरी म्हणत आहेत. पण त्यांचे क्वचितच ऐकले जाते. सामान्य माणूस केवळ तक्रार करत राहतो. पण जेव्हा नेते मंडळींना अडचण येते तेव्हा प्रशासन लगेच पाऊल उचलते. रेल्वेत प्रवास करताना लोक नेहमी तक्रार करतात की त्यांच्या तक्रारी ऐकून घेणारे कोणी नाही, अशा शब्दांत नेटकरी या प्रकरणावर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशrailwayरेल्वेBJPभाजपाMember of parliamentखासदारSocial Mediaसोशल मीडिया