UP Assembly Election : शंभर दिवस अन् 100 कार्यक्रम...; उत्तर प्रदेश निवडणुकीत विजयासाठी भाजपनं तयार केला मेगाप्लॅन!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 07:49 PM2021-10-11T19:49:47+5:302021-10-11T19:50:44+5:30

मतदारांशी संवाद साधण्यासाठी पक्षाच्या 100 दिवसांच्या या कार्यक्रमासंदर्भात, चर्चेच्या शेवटच्या फेरीसाठी मंगळवारी दिल्ली येथे एक बैठकही बोलावण्यात आली आहे. 

UP Uttar Pradesh assembly election 100 programs in 100 days on bjp's agenda | UP Assembly Election : शंभर दिवस अन् 100 कार्यक्रम...; उत्तर प्रदेश निवडणुकीत विजयासाठी भाजपनं तयार केला मेगाप्लॅन!

UP Assembly Election : शंभर दिवस अन् 100 कार्यक्रम...; उत्तर प्रदेश निवडणुकीत विजयासाठी भाजपनं तयार केला मेगाप्लॅन!

Next

 

लखनौ -उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीला आता पाच महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. यापार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष पुन्हा विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी कंबर कसून कामाला लागला आहे. आता भाजप आपल्या निवडणूक अजेंड्यांतर्गत 100 दिवसांत 100 कार्यक्रम करण्याची तयारी करत आहे. मतदारांशी संवाद साधण्यासाठी पक्षाच्या 100 दिवसांच्या या कार्यक्रमासंदर्भात, चर्चेच्या शेवटच्या फेरीसाठी मंगळवारी दिल्ली येथे एक बैठकही बोलावण्यात आली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघटनेचे सरचिटणीस सुनील बन्सल, उत्तर प्रदेशचे प्रभारी राधा मोहन सिंग, यूपी भाजपचे प्रमुख स्वतंत्र देव सिंह हे एकूणच रणनीतीवर चर्चा करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष यांची दिल्लीत भेट घेत आहेत. भाजप सरकारने सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांसह मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर योजना तयार केली जात असल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे.

पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक आघाडीला विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यक्रम आणि बैठका पूर्ण करण्यासाठी ठराविक दिवस दिले जातील. प्रत्येक आघाडीला प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पोहोचायचे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या यादीत मंडलनिहाय पन्ना प्रमुख संमेलन, सहा भागांत सदस्यत्व अभियान, कमल दिवाळी, प्रत्येक बूथमध्ये 100 सदस्य सामील करणे, तसेच ज्या 81 जागांवर गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनाचा पराभव झाला होता, त्या ठिकाणी रॅलींचा समावेश आहे. 

दिल्लीत बोलावण्यात आलेल्या या बैठकीत प्रत्येक मतदारांपर्यंत आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना कसे पोहोचवायचे? यासह, विरोधी पक्षांकडून होत असलेल्या हिंदू मतांच्या धृवीकरणासंदर्भातही चर्चा होईल.

Web Title: UP Uttar Pradesh assembly election 100 programs in 100 days on bjp's agenda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.