शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

Gyanvapi Row : ज्ञानवापी वादावर अखिलेश यादव यांचा मोठा दावा, भाजपवर केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 7:27 PM

Akhilesh Yadav on Gyanvapi row : भाजपकडे असे द्वेषाचे कॅलेंडर आहे. असे मुद्दे ते निवडणुका येईपर्यंत सातत्याने काढत राहतील, असा दावाही अखिलेश यांनी केला.

ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेवरून निर्माण झालेल्या कायदेशीर वादानंतर, आता या मुद्द्यावरून राजकीय वातावरणही तापताना दिसत आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींसारख्या नेत्यांनी हिंदू पक्षाचा दावा आधीच फेटाळून लावला आहे. यातच, आता या वादावर सपाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनीही प्रतिक्रिया देत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी, असे मुद्दे उपस्थित केले जात असल्याचे अखिलेश यांनी म्हटले आहे.

'भाजपकडे द्वेशाचे कॅलेंडर' -अखिलेश यादव म्हणाले, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून  जाणूनबुजून ज्ञानवापीसारखे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. आज तेल आणि खाद्यपदार्थ प्रचंड महाग झाले आहेत. वाढती महागाई आणि बेरोजगारीसंदर्भात भाजपकडे उत्तर नाही. एवढेच नाही तर, भाजपकडे असे द्वेषाचे कॅलेंडर आहे. असे मुद्दे ते निवडणुका येईपर्यंत सातत्याने काढत राहतील, असा दावाही अखिलेश यांनी केला.

खासगीकरणावर प्रश्न उपस्थित करत अखिलेश म्हणाले, आज देशाची संपत्ती विकली जात आहे. भाजप 'वन नेशन, वन रेशन'ची घोषणा देते. मात्र, 'वन नेशन, वन बिझनेसमन' वर काम करताना दिसत आहे. अखिलेश यांच्या शिवाय, इतरही अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी ज्ञानवापी सर्व्हे हा राजकीय पाऊल असल्याचे म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे.

तत्पूर्वी, ज्ञानवापी मशिदीसंदर्भातील वादावर सुनावणी करताना आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला आदेश देत, ज्या ठिकाणी 'शिवलिंग' आढळून आले, ते ठिकाण सील करण्यात यावे आणि त्याला संपूर्ण सुरक्षा देण्यात यावी. तसेच, नमाजमध्येही व्यत्यय येऊ नये, असे म्हटले आहे.

 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा