"...म्हणून प्रत्येक घरात परवानाधारक शस्त्रे ठेवावीत"; भाजपाच्या महिला मंत्र्यांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 12:25 PM2021-09-08T12:25:01+5:302021-09-08T12:28:16+5:30

BJP Usha Thakur says keep licensed weapons in every house : उषा ठाकूर या आपल्या वादग्रस्त विधानांसाठी लोकप्रिय आहेत. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत.

usha thakur mp minister says keep licensed weapons in every house saffronisation of whole world | "...म्हणून प्रत्येक घरात परवानाधारक शस्त्रे ठेवावीत"; भाजपाच्या महिला मंत्र्यांचं वादग्रस्त विधान

"...म्हणून प्रत्येक घरात परवानाधारक शस्त्रे ठेवावीत"; भाजपाच्या महिला मंत्र्यांचं वादग्रस्त विधान

googlenewsNext

नवी दिल्ली - शिवराज सरकारमधील मंत्री आणि मध्य प्रदेशच्या महूच्या आमदार उषा ठाकूर (Usha Thakur) या आपल्या वादग्रस्त विधानांसाठी लोकप्रिय आहेत. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. उषा ठाकूर यांनी संपूर्ण जगाला भगवं करण्याचं एक अजब सूत्र सांगितलं आहे. "सद्यस्थितीतील वाढते धोके पाहता प्रत्येक घरात परवानाधारक शस्त्रे-अस्त्रे ठेवली पाहिजेत" असं ठाकूर यांनी म्हटलं आहे. तसेच "भगवा हा शांतीचं प्रतीक आहे. त्यामुळे जर संपूर्ण जग भगवं झालं तर सगळीकडे आनंदाचं आणि शांततेचं वातावरण असेल" असंही म्हटलं आहे. भोपाळमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी लोकांना संबोधित करताना ठाकूर यांनी वादग्रस्त विधानं केलं आहे.

भोपाळ येथे मंगळवारी राजपूत महिला शाखेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उषा ठाकूर बोलत होत्या. "सर्वांचे पूर्वज एकच आहेत" या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावर उषा ठाकूर म्हणाल्या की "ऐतिहासिक पुरावे हे सिद्ध करतात की खरंतर सर्व पूर्वज हिंदूच होते. जर तुम्ही गेल्या चार-पाच पिढ्यांचा अभ्यास केलात तर तुम्हाला स्वतःलाच हे लक्षात येईल." ठाकूर यांनी पुढे वैद्यकीय अभ्यासक्रमात संघाची विचारधारा शिकवण्याच्या प्रश्नावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

"भगवीकरण हा भारतीय संस्कृतीचा आत्मा, त्याग आणि बलिदानाचं प्रतीक"

"प्रेरणादायी लोकांबद्दल शिकवणं हे चुकीचं कसं असू काय शकतं? भगवीकरण हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. हे त्याग आणि बलिदानाचं प्रतीक आहे" असं त्या म्हणाल्या. तसेच "मुलांना संस्कार देण्यासाठी आणि कुटुंबाला उत्तम आरोग्य देण्यासाठी, आध्यात्मिक शिक्षण आणि नियमित पूजा-हवन केलंच पाहिजे"  असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी उषा ठाकूर यांनी अनोखी शक्कल लढवली होती. माझ्यासोबत सेल्फी काढायचा असेल तर 100 रुपये द्या असं म्हटलं होतं. अनेकदा सेल्फीमुळे त्यांना एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला पोहचण्यास उशीर होतो. त्यामुळेच ज्याला आपल्यासोबत सेल्फी काढायचा असेल त्याला अगोदर पक्षासाठी 100 रुपयांचा निधी जमा करावा लागेल, अशी घोषणा ठाकूर यांनी केली होती.

"100 रुपये द्या अन् माझ्यासोबत सेल्फी घ्या"; ...म्हणून भाजपाच्या 'या' मंत्र्यांनी लढवली शक्कल

"सेल्फीमुळे बराचसा वेळ हा वाया जातो. त्यामुळे काही वेळा लोक सेल्फी घ्यायला येतात आणि त्यातच वेळ गेल्याने कार्यक्रमांना पोहचण्यास उशीर होतो. म्हणूनच संघटनात्मक दृष्टीने आता जे कोणी आपल्यासोबत सेल्फी घेऊ इच्छितात त्यांनी भाजपाच्या पक्ष कार्यालयात 100 रुपये जमा करणं गरजेचं आहे" असं उषा ठाकूर यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या सेल्फी विधानाची सर्वत्र जोरदार चर्चा झाली. तसेच उषा ठाकूर यांनी फुल अथवा पुष्पगुच्छ देण्याऐवजी पुस्तक देण्याचा सल्ला दिला. यापुढे आपण फुलांऐवजी पुस्तकं घेऊ असं म्हटलं होतं.

Web Title: usha thakur mp minister says keep licensed weapons in every house saffronisation of whole world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.