शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
3
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
4
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
5
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
6
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
7
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
8
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
9
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
Adhik Maas 2026: अधिक मसात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
11
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
12
रील बनवण्याचे वेड अन् दोन प्रियकरांचे लफडे; भरल्या घरात बेसबॉल बॅटने नव्या बॉयफ्रेंडचा खेळ खलास
13
विजयच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी अन् मुलांनी फिरवली पाठ, लेकाने हटवलं वडिलांचं नाव
14
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
15
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
16
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
17
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
18
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
19
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
20
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

प्रार्थनास्थळांत गेल्यावरही मास्क वापरा -हर्षवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 02:33 IST

आवश्यक बंधने पाळण्याचे आवाहन

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या काळात लोकांनी प्रार्थनास्थळांमध्ये गेल्यानंतरही मास्क कायम ठेवावा. मास्क घालण्यास देवाने मनाई केलेली नाही. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी लोकांनी आवश्यक ती सर्व बंधने पाळावीत, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले आहे.

देशातील कोरोनाची स्थिती व या संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने केलेली तयारी याबाबत सोशल मीडियावरून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे डॉ. हर्षवर्धन यांनी एका कार्यक्रमात दिली. ते म्हणाले की, केवळ मंदिरे किंवा अन्य प्रार्थनास्थळांतच नव्हे तर प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी जाताना लोकांनी मास्क घातला पाहिजे. प्रार्थनास्थळे पुन्हा खुली करताना काय दक्षता घ्यावी, याबद्दल केंद्र सरकारने याआधीच सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांचे काटेकोर पालन होत आहे किंवा नाही, हे पाहणे ही राज्य सरकारांची जबाबदारी
आहे.



डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या संसर्गाचा श्वसनसंस्थेव्यतिरिक्त हृदय व अन्य अवयवांच्या कार्यावर परिणाम होतो, असा निष्कर्ष एका संशोधनातून काढण्यात आला आहे. त्या निष्कर्षाची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. अशा संशोधनातील निष्कर्षांचा विचार करण्यासाठी केंद्र सरकारने तज्ज्ञ मंडळींची एक समिती नेमली आहे. ते या मुद्यांचा विचार करून केंद्र सरकारला योग्य त्या शिफारसी करीत असतात. त्यानुसार मग सरकार आपली धोरणे आखते. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेनेही कोरोना संसर्गाच्या विविध दुष्परिणामांचा अभ्यास करावा, असा आदेश केंद्र सरकारने दिला आहे.
रेमडेसिवीर, प्लाझ्मा थेरपीचा
मोठ्या प्रमाणावर वापर नको
डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, देशात कोरोनावरील उपचारांसाठी रेमडेसिवीर व प्लाझ्मा थेरपीचा मोठ्या प्रमाणावर वापर सध्या सुरू आहे. त्याचे प्रमाण कमी करावे, असे विविध राज्य सरकारे तसेच खासगी रुग्णालयांना सांगण्यात आले आहे.
 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली