डोनाल्ड ट्रम्प यांचा 'पाकिस्तान'मार्फत इराणला निरोप, पण इराणने उडवली खिल्ली; करार पुन्हा धोक्यात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 14:20 IST2026-03-25T14:18:06+5:302026-03-25T14:20:16+5:30

अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेत मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवलेल्या पाकिस्तानच्या मध्यस्थांमार्फत १५-कलमी शस्त्रसंधी योजना इराणला सादर करण्यात आली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

US Israel Iran War Donald Trump's farewell to Iran through 'Pakistan', but Iran mocked him; Is the deal in danger again? | डोनाल्ड ट्रम्प यांचा 'पाकिस्तान'मार्फत इराणला निरोप, पण इराणने उडवली खिल्ली; करार पुन्हा धोक्यात?

डोनाल्ड ट्रम्प यांचा 'पाकिस्तान'मार्फत इराणला निरोप, पण इराणने उडवली खिल्ली; करार पुन्हा धोक्यात?

मागील काही दिवसांपासून सुरू असलेले अमेरिका आणि इराणमधील युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तान यामध्ये मध्यस्थी करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी इराणच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली. बुधवारी युद्धविराम करारासाठी मध्यस्थी करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांची खिल्ली उडवली आणि अमेरिकेने प्रस्तावित केलेल्या १५-कलमी योजनेला यशस्वी होण्याची काही शक्यता आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. 

‘F-35 पाडण्यापेक्षा सैनिकांना मारणं सोपं, जवळ या, आम्ही वाटच पाहतोय’, इराणचं अमेरिकेला आव्हान

इराणचे नियमित सैन्य आणि निमलष्करी 'रिव्होल्यूशनरी गार्ड्स' यांना संयुक्तपणे आदेश देणाऱ्या खातम अल-अंबिया या केंद्रीय मुख्यालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल इब्राहिम झुल्फघारी यांनी, मध्यस्थीद्वारे १५-कलमी योजना इराणला सादर केल्यानंतर हे विधान केले.

इराणने हा दावा फेटाळला

"अमेरिकी अधिकारी या योजनेवर इराणसोबत वाटाघाटी करत आहेत, असे ट्रम्प यांनी सांगितले होते. सरकारी दूरचित्रवाणीवर प्रसारित केलेल्या एका निवेदनात झुल्फघारी यांनी कोणतीही वाटाघाटी होत नसल्याचे सूचित केले. झुल्फघारी यांचे निवेदन एका पूर्व-नोंदणी केलेल्या व्हिडिओद्वारे प्रसिद्ध करण्यात आले. त्यांनी विचारले, "तुमचे अंतर्गत मतभेद इतक्या टोकाला पोहोचले आहेत का की तुम्ही आपापसातच वाटाघाटी करत आहात?"

झुल्फघारी म्हणाले, "पहिल्या दिवसापासून आमचा पहिला आणि शेवटचा मुद्दा हाच होता आणि राहील. आमच्यासारखे लोक तुमच्यासारख्या लोकांशी कधीही तडजोड करणार नाहीत. आता नाही, कधीच नाही.

पाकिस्तानमार्फत मागण्या सादर

एका अधिकाऱ्याने सांगितले की, १५-कलमी शस्त्रसंधी योजना पाकिस्तानी मध्यस्थांमार्फत इराणला सादर करण्यात आली आहे. पाकिस्तानने अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेत मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

जेव्हा अमेरिकी सैन्य या प्रदेशात आधीच तैनात असलेल्या सुमारे ५०,००० सैनिकांना अधिक बळकटी देण्यासाठी ८२ व्या एअरबोर्न डिव्हिजनमधून किमान १,००० अतिरिक्त सैनिक तैनात करण्याच्या तयारीत आहे. 

Web Title : पाकिस्तान के ज़रिये ट्रम्प का ईरान को संदेश, ईरान ने उडाई खिल्ली?

Web Summary : ईरान ने पाकिस्तान के माध्यम से भेजे गए 15-सूत्रीय युद्धविराम योजना को खारिज कर दिया और अमेरिका के साथ किसी भी बातचीत से इनकार किया। एक ईरानी अधिकारी ने बढ़ते तनाव और क्षेत्र में अतिरिक्त सैनिकों की तैनाती के बीच अमेरिकी प्रयासों का मज़ाक उड़ाया। ईरान ने कहा कि वह अमेरिका के साथ कभी समझौता नहीं करेगा।

Web Title : Iran dismisses Trump's message via Pakistan, deal in jeopardy?

Web Summary : Iran rejected a 15-point ceasefire plan conveyed through Pakistan, dismissing any negotiations with the U.S. An Iranian official mocked the U.S. efforts amid rising tensions and deployment of additional troops to the region. Iran stated it would never compromise with America.