जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये सुरक्षा दलांनी नियंत्रण रेषेवर (LoC) घुसखोरीचा एक मोठा कट उधळून लावला आहे. 'ऑपरेशन डिग्गी २' (OP DIGGI 2) अंतर्गत सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त मोहिमेत एका पाकिस्तानीदहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, १४ आणि १५ मार्च २०२६ च्या मध्यरात्री उरी सेक्टरमधील बुच्छर (Buchhar) भागाला सैन्याने आणि पोलिसांनी घेरलं होतं.
दाट जंगलाचा फायदा घेऊन घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना सतर्क जवानांनी वेळेतच हेरलं. याच दरम्यान दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा खात्मा झाला.
मारल्या गेलेल्या दहशतवाद्याकडून एक एके-रायफल (AK Rifle), पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणात काडतुसांसह युद्धासाठी लागणारं इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. हा दहशतवादी सीमेपलीकडून एखादी मोठी घटना घडवण्याच्या उद्देशाने आल्याचा सुरक्षा दलांचा संशय आहे. परिसरात इतर कोणी दहशतवादी लपले नाहीत ना, याची खात्री करण्यासाठी सध्या शोध मोहीम सुरू आहे.
Web Summary : Security forces foiled a major infiltration attempt in Uri sector, Jammu & Kashmir. A Pakistani terrorist was killed in a joint operation by the army and police. The terrorist was carrying an AK-rifle, pistol and ammunition, indicating a planned major attack. Search operation is underway.
Web Summary : जम्मू-कश्मीर के उरी सेक्टर में सुरक्षा बलों ने घुसपैठ की एक बड़ी कोशिश को नाकाम कर दिया। सेना और पुलिस के संयुक्त अभियान में एक पाकिस्तानी आतंकवादी मारा गया। आतंकवादी के पास से एके-राइफल, पिस्तौल और गोला-बारूद बरामद हुआ, जिससे एक बड़े हमले की योजना का संकेत मिलता है। तलाशी अभियान जारी है।