शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आठवेळा आलं अपयश पण जिद्द कायम; UPSC परिक्षेत दिल्ली पोलिसाची 'यशस्वी' झेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 14:52 IST

दिल्ली पोलिसात कार्यरत असणाऱ्या राम भजन कुमार यांनी आठव्या प्रयत्नात यश मिळवले आहे.

UPSC IAS IPS Result 2023 : प्रयत्न करणाऱ्याला यश मिळतंच असं वडीलधारी माणसं नेहमी सांगत असतात. असंच काहीसं दिल्ली पोलीस दलात सक्रिय असलेल्या जवानाबद्दल झालं आहे. तब्बल आठवेळा अपयश आल्यानंतरही त्यानं जिद्दीच्या जोरावर UPSC परिक्षेचा गड सर केला. मंगळवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर केला. दिल्लीच्या इशिता किशोरने देशात पहिला क्रमांक पटकावला, तर ठाण्याच्या कश्मिरा संखे हिने राज्यात पहिला क्रमांक मिळवला.

दरम्यान, दिल्ली पोलिसात कार्यरत असणाऱ्या रामभजन कुमार यांनी आठव्या प्रयत्नात यश मिळवले आहे. आपल्या यशामागे धर्मपत्नीचा मोठा हात असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल राम भजन हे सायबर सेल पोलीस स्टेशनमध्ये तैनात आहेत. त्यांनी आठव्या प्रयत्नात UPSC परिक्षेत ६६७ वी रॅंक मिळवली.

रामभजन यांनी स्वप्न साकार झाल्याचा आनंद साजरा केला. त्यांनी सांगितले की, हा त्यांचा आठवा प्रयत्न होता, ते ओबीसी प्रवर्गातील आहेत, त्यामुळे ते नऊ प्रयत्नांसाठी पात्र आहेत पण हा त्यांचा शेवटचा प्रयत्न होता. "मला वाटले होते की, या वेळी जरी मला यश मिळाले नसते तरी मी पुढच्या प्रयत्नाची तयारी करून पुढे गेलो असतो", असंही त्यांनी सांगितलं. 

यशाबद्दल म्हटले... "मी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तयारी करत होतो. याशिवाय, माझ्या पत्नीने मला सतत प्रोत्साहन दिले आणि नेहमीच माझी शक्ती म्हणून ती माझ्या पाठीशी उभी राहिली", अशा शब्दांत त्यांनी आपल्या यशाचे श्रेय पत्नीला दिले. कुमार २००९ मध्ये कॉन्स्टेबल म्हणून फोर्समध्ये सामील झाले. 

 

 

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिसupscकेंद्रीय लोकसेवा आयोगInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी