upload your selfie on social media samsung phone will be available in return gift | लय भारी! सोशल मीडियावर Selfie अपलोड करा आणि रिटर्न गिफ्टमध्ये स्मार्टफोन मिळवा; जाणून घ्या भन्नाट ऑफर

लय भारी! सोशल मीडियावर Selfie अपलोड करा आणि रिटर्न गिफ्टमध्ये स्मार्टफोन मिळवा; जाणून घ्या भन्नाट ऑफर

नवी दिल्ली - सध्या सेल्फीचा जमाना आहे. सेल्फी (Selfie) काढायला सर्वांनाच आवडतं. प्रत्येकाच्या फोनमध्ये असंख्य सेल्फी असतातच. अनेक जण ते सोशल मीडियावर अपलोड देखील करतात. पण तुम्हाला जर कोणी सेल्फी अपलोड करा आणि मोबाईल फोन मिळवा असं सांगितलं. तर तुमचा सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. कोणीतरी आपली चेष्टा करतंय असं वाटेल पण हो हे खरं आहे. सोशल मीडियावर तुमचे सेल्फी अपलोड करायचे आहेत आणि त्या बदल्यात रिटर्न गिफ्ट म्हणून तुम्हाला सॅमसंगचा स्मार्टफोन मिळणार आहे. उत्तर दिल्ली महापालिकेने (North MCD) ही भन्नाट ऑफऱ दिली आहे.

जनतेला स्वच्छ सर्वेक्षण - 2021 (Swachh Survekshan-2021) मध्ये जोडण्यासाठी उत्तर दिल्ली महापालिकेने जोरदार तयारी सुरू केली. याचाच एक भाग म्हणून ही अनोखी ऑफर देण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत लोकांना आपल्या सहा कामांचे सेल्फी फेसबुक  (Facebook), टि्वटर (Twitter) आणि इन्स्टाग्राम  (Instagram) या सोशल मीडियावर पोस्ट करायचे आहेत. त्यानुसार जे गुण मिळतील त्या आधारावर नॉर्थ दिल्ली महापालिका विजेत्यांना सॅमसंग फोन बक्षीस म्हणून देणार आहे. तसेच विजेत्याला सॅमसंग फोनशिवाय इतर पुरस्कारही दिला जाणार आहे. 

उत्तर दिल्लीचे महापौर जयप्रकाश (Mayor Jai Prakash) यांनी करोल बाग विभागातील स्वच्छ सर्वेक्षण - 2021च्या  #14 दिवसांच्या चॅलेंजमध्ये भाग घेतला आहे. नागरिकांसाठी #14 दिवसांचं चॅलेंज ही एक मोहीम सुरू केली. सोशल मीडियावर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी आपले स्वच्छतासंबंधी सेल्फी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर # 14dayschallenge, #Swacchdelhi या हॅशटॅगसह  @North DMC या @kbzdc, @ kzzdc1 आणि @KBZ Dc या ट्विटर अकाऊंटला टॅग करायचे आहेत. प्रत्येक कार्य पूर्ण करून नागरिक 14 दिवसांपर्यंत आपले फोटो सोशल मीडियावर अपलोड करू शकता. 

ज्या अंतर्गत सहा कामं करताना आपले सेल्फी शेअर करायचे आहेत. या कामांमध्ये घरात ओला, सुका आणि घातक कचरा वेगवेगळा ठेवणं, ओला कचऱ्यापासून घरीच खत तयार करणं, प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळणं, कमीत कमी कचरा करणं, कचऱ्याचा पुनर्वापर करणं, एक झाड लावणं आणि विविध ठिकाणी लागलेल्या स्वच्छ सर्वेक्षण - 2021 च्या लोगोसह सेल्फी काढणं याचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक कार्याला 10 गुण दिले जाणार आणि फोटोवरील प्रतिक्रिया पाहून त्यावर इतर गुण दिले जाणार. कोणताही नागरिक हे स्वच्छतेचं आवाहन स्वीकारून #14 दिवसांच्या चॅलेंजमध्ये सहभागी होऊन आकर्षक पुरस्कार जिंकू शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: upload your selfie on social media samsung phone will be available in return gift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.