दंगलीमुळे घर सोडले; 46 वर्षांनंतर हिंदू कुटुंब संभलमध्ये परतले, मंदिरात दर्शन घेतले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 22:08 IST2024-12-17T22:06:04+5:302024-12-17T22:08:38+5:30
UP Sambhal Temple : संभलमध्ये 1978 साली झालेल्या दंगलीनंतर हिंदूंना आपले घर सोडावे लागले होते.

दंगलीमुळे घर सोडले; 46 वर्षांनंतर हिंदू कुटुंब संभलमध्ये परतले, मंदिरात दर्शन घेतले...
UP Sambhal Temple : उत्तर प्रदेशातील संभलमध्ये प्रशासनाच्या सर्वेक्षणादरम्यान एक प्राचीन मंदिर सापडले. मुस्लिमबहूल भागात मंदिर सापडल्याची देशभरात चर्चा सुरू आहे. 1978 साली झालेल्या दंगलीनंतर या परिसरात राहणाऱ्या सर्व हिंदूंनी पलायन केल्यानंतर स्थानिक मुस्लिमांनी मंदिर परिसरावर कब्जा केला. आता हे मंदिर 46 वर्षांनंतर सर्वांसाठी खुले करण्यात आले असून, भाविक दर्शनासाठी येत आहेत. विशेष म्हणजे, दंगलीदरम्यान परिसर सोडलेल्या एका हिंदू जोडप्याने आज देवाचे दर्शन घेतले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला.
माझ्याकडे दंगलीचा फोटो
अनिल कुमार रस्तोगी यांनी सांगितले की, आमचे या भागात दुकान होते. 1978 साली दंगल झाल्याचे कळताच मी दुकान बंद करुन घरी गेलो. नंतर माझे दुकान जळाल्याची माहिती मला सायंकाळी मिळाली. दुसऱ्या दिवशी मी जाऊन पाहिले तर माझे संपूर्ण दुकान आणि सामान जळाले होते. माझ्याकडे त्या दंगलीचा फोटो तर आहेच, पण तो दिवस मला आजही जशाश तसा आठवतो. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जे काही सांगितले, ते बरोबर आहे आणि ते जे काही करत आहेत, तेही अगदी बरोबर आहे.
मंदिराजवळील विहिरीत 3 मूर्ती सापडल्या...
संभलमध्ये 48 वर्षांनंतर उघडलेल्या मंदिराजवळ असलेल्या विहिरीच्या खोदकामात एकामागून एक तीन मूर्ती सापडल्या. या मूर्ती माता पार्वती, गणेश आणि लक्ष्मीच्या आहेत. सध्या तपास सुरू असून, परिसार मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
कसे सापडले मंदिर?
वीजचोरी रोखण्यासाठी आलेल्या पोलीस आणि प्रशासनाच्या पथकाने 1978 पासून बंद असलेले हे मंदिर गेल्या शनिवारी शोधून काढले होते. यानंतर 15 सप्टेंबर रोजी या मंदिरात विधी व मंत्रोच्चारासह पूजा आरती करण्यात आली. हे कार्तिक महादेवाचे मंदिर असल्याची माहिती जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र पेनसिया यांनी दिली. मंदिर सापडल्यानंतर येथे 24 तास सुरक्षेसाठी एक पथक तैनात करण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत.