अखेर सीमा हैदरने उघडं केलं सत्य? सचिनपूर्वीही अनेक भारतीयांशी होती संपर्कात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 13:02 IST2023-07-18T13:01:46+5:302023-07-18T13:02:08+5:30
Seema Haider Case : यूपी एटीएसच्या चौकशीत सीमा हैदरने सचिनच्या आधीही अनेक भारतीयांशी संपर्क साधल्याची माहिती मिळाली आहे.

अखेर सीमा हैदरने उघडं केलं सत्य? सचिनपूर्वीही अनेक भारतीयांशी होती संपर्कात
गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेल्या पाकिस्तानहून आलेल्या सीमा हैदरला काल युपी एटीएसने ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेश एटीएसने सीमा हैदरच्या चौकशीत मोठा खुलासा झाला आहे. चौकशीदरम्यान सीमाने सांगितले की, सचिनच्या आधीही तिने भारतातील काही लोकांशी संपर्क साधला होता. सीमा हैदर हिने ज्या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यापैकी बहुतेक दिल्ली एनसीआरमधील होते. मिळालेल्या माहितीनुसार, सीमा हैदरने यूपी एटीएसच्या कालच्या चौकशीत प्रत्येक प्रश्नाचे मोजमाप उत्तर दिले आहे. चौकशीत तिच्या चेहऱ्यावर भीतीचा अजिबात भाव दिसत नव्हता.
Video: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; ६ जण जागीच ठार ३ जण जखमी
यूपी एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कालच्या चौकशीनंतर सीमा हैदरला कोणतेही रहस्य उलगडणे सोपे नाही, चौकशीदरम्यान सीमा हैदरला इंग्रजीच्या काही ओळी वाचायला लावल्या होत्या, ज्या सीमा हैदरने चांगल्या प्रकारे वाचल्या नाहीत, तर इंग्रजी उच्चारही चांगले केले.
एटीएसने सीमा हैदरची स्वतंत्रपणे चौकशी केली. यात तिने प्रश्नानांना उत्तरे दिली. सीमा हैदरची सोमवारी यूपी एटीएसने नोएडाच्या सेक्टर-94 कार्यालयात सुमारे १० तास चौकशी केली, मात्र आज सीमा हैदरची कुठे चौकशी होणार याबाबत अजुनही माहिती समोर आलेली नाही.
यूपी एटीएसच्या चौकशीत असे आढळून आले की, ज्या दिवसांमध्ये सीमा हैदरने सचिन मीनाच्या आधी भारतीयांशी जवळीक वाढवली होती, तेव्हाच पब-जी गेम खेळताना तिचा त्याच्याशी संपर्क होता. मात्र, हे लोक कोण आहेत, त्यांची माहिती सध्या फक्त यूपी एटीएसकडे आहे. येत्या काही दिवसांत एटीएस या लोकांचा शोध घेऊन त्यांची चौकशीही करेल अशी शक्यता आहे.